आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • BSE NSE Sensex And Stock Market Latest Update: March 25 Share Market, Trade BSE, Nifty, Sensex Live News Updates

शेअर मार्केट LIVE: अर्थमंत्री आणि अमेरिकी फेड रिझर्वने उचललेल्या पाउलानंतरही देशातील बाजारात चढ-उतार, सेंसेक्स 1038 अंकांनी आणि निफ्टीची 275 पॉइंटची उसळी

Mumbai6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुधवारी सेंसेक्स 2.67% आणि निफ्टी 2.51% च्या बढतीने बंद झाला

मुंबई- मंगळवारी झालेल्या उसळीनंतर बंद झालेला शेअर मार्केट  बुधवारीदेखील वाढीनेच सुरू झाला. परंतू, सुरुवातीच्या अर्ध्या तासानंतर बाजारात चढ-उतार येणे सुरू झाला. आता सेंसेक्स 1038.54 अंकांनी वर होऊन 27712.57 आणि निफ्टी 275.50 पॉइंटच्या उसळीसोबत 8,076.55 वर स्थिर आहे. यापूर्वी मंगळवारी काही काळासाठी बाजारत चढ-उतार पाहायला मिळाला. परंतू, सेंसेक्स 692.79 अंकांच्या वाढीसोबत 26,674.03 वर आणि निफ्टी 190.80 अंकांच्या वाढीसोबत 7,801.05 वर बंद झाला.

मंगळवारी डाउ जोंस 11.37% आणि एसएंडपीची 9.38% उसळी
मंगळवारी अमेरिकी बाजारासोबतच जगभरातील बाजारात उसळी पाहायला मिळाली. डाउ जोंस 11.37 % वाढीसोबत 2112.98 अंकांवर बंद झाला. अशाचप्रकारे अमेरिकेतील दुसरा बाजार नॅस्डॅक 8.12 % वाढीसोबत 557.18 अंक आणि एसएंडपी 9.38 % वाढीसोबत 209.93 पॉइंटवर बंद झाला. चीनमधील बाजार शंघाई कम्पोसिटमध्येही 1.70 % वाढ पाहायला मिळाली. हा 46.25 अंकांच्या वाढीसोबत बंद झाला. यापूर्वीच सोमवारी या बाजारात घट पाहायला मिळाली.

21 दिवस देशात लॉकडाउन
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी देशभरात लॉकडाउची घोषणा केली आहे. म्हणजेच पुढील 14 एप्रिलपर्यंत देशभरातील 130 कोटी जनता आपल्या घरात कैद असेल. यावेळी मोदी म्हणाले की, निश्चितपणे या लॉकडाउची आपल्या देशाला आर्थिक किंमत मोजावी लागेल. पण, देशातील प्रत्येक भारतीयाचा जीव वाचवणे, हीच माझी आणि आमच्या सरकारची प्राथमिकता आहे. यामुळेच, मी तुम्हाला प्रार्थना करतो की, तुम्ही सध्या आपला घरातच राहा. सध्याची परिस्थिती पाहता पुढील 21 दिलस देशात लॉकडाउन असेल. पुढील 21 दिवस देशाला सांभाळले नाही,
तर देश 21 वर्षे मागे जाईल.

सामान्य नागरिकांसाठी सरकारचे 4 पाउले

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशातील सध्याच्या परिस्थीती पाहता, पत्रकार परिषद घेऊन पुढील तीन महिन्यांपर्यंत कोणत्याही एटीएममधून पैसे काढल्यावर लागणारा चार्ज बंद केला आहे. तसेच, बँकेत ठेवण्यासाठी मिनिमम बॅलेन्सचीही अट तात्पुरती बंद केली आहे. यासोबतच इनकम टॅक्स रिटर्न फाइल करणे आणि पॅन-आधार लिंक करण्याची तारीखदेखील 30 जूनपर्यंत बंद केली आहे. 

0