आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज शेअर बाजारात तेजी:सेन्सेक्स 130 अंकांच्या वाढीसह 62,157 वर उघडला, 30 पैकी 21 शेअर्समध्ये वाढ

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच आज सोमवारी (15 मे) शेअर बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्स 130 अंकांच्या वाढीसह 62,157 च्या पातळीवर उघडला. निफ्टीही 25 अंकांनी वाढून 18,339 वर उघडला. सुरूवातीच्या व्यापारादरम्यान, सेन्सेक्सच्या 30 पैकी 21 शेअर्समध्ये वाढ झालेली दिसून आली. 9 मध्ये घट झाल्याचे दिसून आली. त्याचवेळी, डॉलरच्या तुलनेत रुपया 6 पैशांनी कमजोर झाला आणि 82.24 वर उघडला.

आज अनेक कंपन्यांचे तिमाही रिझल्ट
आज पीव्हीआर आयनॉक्स, अस्ट्राल, सेनच्युरी प्लेबोर्डस, कल्याण ज्वेलर्स, PCBL आणि Pfizer यासह अनेक कंपन्यांचे निकाल जाहीर होणार आहेत. तर एअरटेल आणि बँक ऑफ बडोदाचे तिमाही निकाल उद्या म्हणजेच 16 मे रोजी जाहीर होतील.

अदानी समूहावर लक्ष केंद्रीत राहील
अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस तसेच अदानी ट्रान्समिशनच्या संचालक मंडळाने शनिवारी म्हणजेच १३ मे रोजी भागविक्री निधी उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली. अदानी एंटरप्रायझेस 12,500 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे, तर अदानी ट्रान्समिशन 8,500 कोटी रुपये उभारण्याची तयारी करत आहे.

कच्च्या तेलाच्या ​​​किमतीत घसरण
कच्च्या तेलात सातत्याने घसरण सुरू आहे. याचा परिणाम म्हणजे तो प्रति बॅरल $74 पर्यंत खाली आला आहे. कच्च्या तेलाचा दर नरमतेसह 73.77 डॉलर प्रति बॅरलवर आला आहे.

शुक्रवारी बाजारात होती तेजी
याआधी शुक्रवारी म्हणजेच 12 मे रोजी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स 123 अंकांच्या वाढीसह 62,027 च्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्येही 17 अंकांची वाढ दिसून आली. दुसरीकडे, सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 19 समभाग वर तर 11 घसरले.