आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • BSE NSE Sensex Today | Stock Market Latest Update: April 17 Share Market, Trade BSE, Nifty, Sensex Live News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेअर मार्केट:ट्रेडिंगच्या शेवटच्या दिवशी सेंसेक्स 1054 पॉइंटच्या भरतीसह उघडले, निफ्टी भी 330 पॉइंटने वर; आरबीआयच्या प्रेसनंतर उमेद

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जी-20 देशांपैकी भारताचा विकास दर अंदाज सर्वाधिक -आरबीआय गव्हर्नर

आठवड्याच्या शेवटच्या दिवसाच्या ट्रेडिंगमध्ये बाजार 1 हजारपेक्षा अधिक अंकांच्या उसंडीसह उघडले. सेंसेक्स 1054.07 पॉइंट तर निफ्टी 330.65 पॉइंटच्या बढतीसह सुरू झाले. तत्पूर्वी गुरुवारी शेअर बाजार आठवड्यात पहिल्यांदाच बढतीसह बंद झाले होते. गुरुवारी सेंसेक्स 284.30 अंकांनी खाली आणि निफ्टी 74.05 पॉइंट कमी निर्देशांकांसह उघडले होते. पण, अवघ्या 15 मिनिटांतच चढ-उतार सुरू झाले आणि बाजार बंद होत असताना सेंसेक्स 222.80 अंकांच्या बढतीसह 30,602.61 वर आणि निफ्टी 67.50 अंकांच्या बढतीसह 8,992.80 वर बंद झाले होते.

कोरोनामुळे जगभरात मंदीचा अंदाज

कोविड-19 मुळे सुस्त पडलेल्या अर्थव्यवस्थेच्या हालचालींवरून शुक्रवारी आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानुसार, 50,000 कोटी रुपये किमतीचे TLTRO 2.0 लाँच केले जाणार आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, कोरोना संक्रमणामुळे हा अर्थव्यवस्थेचा सर्वात आंधारमय काळ आहे. या आंधारातून आपल्याला प्रकाशाकडे पाहावे लागेल. ते म्हणाले, भारतासाठी 1.9% जीडीपी विकास दराचा IMF चा अंदाज G20 देशांमध्ये सर्वात अधिक आहे. सोबतच, बँकांनी योग्य काम करण्याचा निर्णय घेतला हे कौतुकास्पद आहे.

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 13,431 झाली आहे. यात 11,215 जण पॉझिटिव्ह, 1,768 संक्रमित बरे होऊन घरी पोहोचले तर 448 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी covid19india.org च्या माध्यमातून देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, जगभरात कोरोना व्हायरसमुळे 1 लाख 45 हजार 515 मृत्यूंची नोंद झाली. तर 5 लाख 46 हजार कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. अमेरिकेत कोरोनामुळे मरणाऱ्यांची संख्या 34 हजार 458 झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...