आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • BSE NSE Sensex Today, Stock Market Latest Update: February 26 Share Market, Trade BSE, Nifty, Sensex Live News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेअर बाजार कोसळला:1,613 अंकांनी घसरण होऊन 49,426 वर आला सेन्सेक्स; एक्सचेंजवर 66% शेअरमध्ये घसरण, BSE चे मार्केट कॅपही  4.6 लाख कोटी कमी झाले

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुंतवणूकदार बाजारात सर्वाधिक बँकिंग शेअर्सची विक्री करत आहेत.

जगभरातील शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे देशांतर्गत बाजारही घसरला. BSE सेन्सेक्स 1,613 अंकांनी म्हणजेच 3.16% खाली घसरून 49,426.18 वर व्यापार करत आहे. मोठ्या घसरणीमुळे इंडेक्सने देखील दिवसाची सर्वात कमी पातळी 49,362.42 गाठली आहे. सेन्सेक्समध्ये ICICI बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे.

गुंतवणूकदार बाजारात सर्वाधिक बँकिंग शेअर्सची विक्री करत आहेत. परिणामी, निफ्टी बँक निर्देशांक 1,705 अंकांनी म्हणजेच 4.67% खाली 34,843.60 वर व्यापार करत आहे. यात खासगी बँकांचे शेअर्स सर्वाधिक तुटलेले आहेत. निर्देशांकात आयसीआयसीआय बँक आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स 5-5 % टक्क्यांपेक्षा जास्त घसरले आहेत. निफ्टी इंडेक्सही 480 अंकांनी म्हणजेच 3.18%नी खाली घसरून 14,616.75 वर व्यापार करत आहे.

घसरणीमध्ये प्रमुख शेअर्स 4% पेक्षा जास्त कोसळले
शेअर बाजारामधील प्रमुख शेअरही जोरदार विक्री करत आहेत. एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्यासह अन्य प्रमुख बँकिंग शअर्स मध्ये 5 टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि भारती एअरटेलही 3 टक्क्यांनी खाली आहेत. परिणामी मार्केट कॅपच्या बाबतीत 10 पैकी 7 मोठ्या कंपन्यांची एकूण बाजारपेठ 1 लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे.

एक्सचेंजमध्ये 66% शेअर्समध्ये घसरण
BSE वर 2,840 शेअर्समध्ये व्यापार सुरू आहे. 829 शेअर्समध्ये वाढ आणि 1,873 मध्ये घसरण आहे. सूचीबद्ध कंपन्यांची बाजारपेठही कालच्या 206.18 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 4.62 लाख कोटी रुपयांवरून घसरून 201.56 लाख कोटींवर गेली आहे. एक्सचेंजमध्ये रेलटेलचा शेअर 11.3% प्रीमियमवर सूचीबद्ध होता. शेअरचा इश्यू प्राइस 94 रुपये होता जो 104.6.6 रुपये सूचीबद्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...