आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • BSE NSE Sensex Today, Stock Market Latest Update: February 3 Share Market, Trade BSE, Nifty, Sensex Live News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेंसेक्स पहिल्यांदा 50 हजारांच्या पुढे:फक्त 60 दिवसांत 45 हजारावरुन 50 हजारावर आला सेंसेक्स

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेअर बाजार बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी वाढीसह बंद झाला. BSE सेंसेक्स 458 अंकांच्या वाढीसह पहिल्यांदा 50,255.75 वर बंद झाला. इंडेक्स यादरम्यान 50,526.39 च्या सर्वाधिक स्तरावर पोहचला. यापुर्वी इंडेक्सने इंट्राडेमध्ये 21 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीलाही 50 हजारांचा पल्ला गाठला होता.

यावर्षी 29 जानेवारीला इंडेक्स 46,285.77 वर बंद झाला होता. यानुसार, मागील तीन दिवसात इंडेक्स 3969.98 अंकाने वाढला आहे. इंडेक्सने 45 हजारापासून 50 हजारांचा प्रवास फक्त 60 दिवसांत पुर्ण केला, कारण सेंसेक्स 4 डिसेंबरला पहिल्यांदा 45,079.55 वर बंद झाला होता. निफ्टी इंडेक्स 142 अंकावर 14,789.95 बंद झाले. यानेही 14,868.85 सर्वाधिक स्तर पार केला.

बाजारातील वाढीची प्रमुख कारणे -

2021-22 बजेट: बहुतेक मार्केट एनालिस्ट मानत आहेत की, ओव्हरऑल बजेट शेअर बाजारासाठी पॉजिटिव्ह आहे, कारण यात नवीन टॅक्स लावण्यात आला नाही. यासोबतच कोरोना सेसबद्दल काहीच घोषणा झाली नाही. याच शंकेमुळे मागील 6 दिवसांपासून मार्केट कोसळत होते.

जागतीक बाजारात वाढ: देशातील बाजाराला जागतीक बाजारात झालेल्या वाढीचा फायदा झाला. यात जापान, कोरियासह यूरोपियन आणि अमेरिकन शेअर बाजारांचा समावेश आहे. याशिवाय अमेरिकेत नवीन कोरोना पॅकेजचाही पॉजिटिव्ह परिणाम पडला.

पक्के संकेत: बाजारात दिग्गज शेअर्सनी चांगली कमाई केली. यात रिलायंस इंडस्ट्रीज, HDFC बँक, HDFC, SBI, इंडसइंड बँक, भारती एअरटेल आणि कोटक महिंद्राच्या शेअर्सचा समावेश आहे.

एक्सचेंजवर 57% शेअर्सची वाढ

बाजारातील वाढीत सरकारी बँक आणि फार्मा सेक्टरचे शेअर सर्वात पुढे होते. यामुळे. निफ्टी फार्मा इंडेक्स 2.79% आणि PSU इंडेक्स 2.61% वर बंद झाला. एक्सचेंजवर 3,141 शेअर्सवर व्यापार झाला. 1,783 शेअर्समध्ये वाढ आणि 1,202 मध्ये कपातीसह बंद झाला. लिस्टेड कंपन्यांचा एकूण मार्केट कॅपदेखील वाढून 198.47 लाख कोटी रुपये झाला आहे. हा मंगळवारी 196.60 लाख कोटी होता.

सर्वात मोठ्या खासगी बँकेवर RBI ची कारवाई

देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या HDFC बँकेच्या डिजिटल सर्विसबाबत नवीन प्रकरण समोर आले आहे. भारतीय रिजर्व बँकेने HDFC बँकेच्या IT इंफ्राच्या ऑडिटसाठी प्रोफेशनल ऑडिट कंपनी नियुक्त केली आहे. असे यामुळे केले, कारण काही दिवसांपूर्वी बँकेचे IT प्लॅटफॉर्म अनेकवेळा बंद पडले होते.

RIL-फ्यूचर डीलवर हायकोर्टाची बंदी

दिल्ली हायकोर्टाने फ्यूचर रिटेल आणि रिलायंस इंडस्ट्रीजमध्ये होणाऱ्या करारावर तुर्तास बंदी घातली आहे. कोर्टाने फ्यूचर ग्रुपला करारामध्ये यथास्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेतील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनच्या विरोधानंतर हायकोर्टाने हा निर्णय दिला.