आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • BSE NSE Sensex Today, Stock Market Latest Update: October 20 Share Market, Trade BSE, Nifty, Sensex Live News Updates

शेअर बाजार अपडेट:बाजारात फ्लॅट व्यवहार, सेंसेक्स 61700 वर आणि निफ्टी 18400 च्या खाली; मेटल शेअरमध्ये कमजोरी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शेअर बाजारचे प्रमुख इंडेक्समध्ये टॉप गेनर आणि लूजर शेअर्सची परिस्थिती

आज बाजाराने थोड्याशा नफ्यासह सुरुवात केली. सेन्सेक्स 61,800 वर आणि निफ्टी 18,439 अंकांवर उघडला. सध्या सेन्सेक्स 70 अंकांनी 61,780 वर आणि निफ्टी 10 अंकांनी 18,430 वर व्यवहार करत आहे.

सेन्सेक्सच्या 30 शेअर्समधून 17 शेअर्स विकले जात आहेत आणि 13 शेअर्सची खरेदी पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये बजाज फिनसर्व, कोटक बँक आणि बजाज ऑटो चे शेअर 1%पेक्षा जास्त कमकुवत आहेत. तर भारती एअरटेल शेअरमध्ये 4% तर एसबीआयच्या शेअरमध्ये 3%पेक्षा जास्त तेजी आहे.

शेअर बाजारचे प्रमुख इंडेक्समध्ये टॉप गेनर आणि लूजर शेअर्सची परिस्थिती

बीएसई वर 3,123 शेअर्स मध्ये ट्रेडिंग होत आहे. ज्यात 1,103 शेअर्स नफ्यासह दिसत आहेत आणि 1,894 शेअर्स लाल निशाण्यात ट्रेडिंग करताना दिसत आहेत. यासह, बीएसई वर लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 270 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. यापूर्वी मंगळवारी सेन्सेक्स 50 पॉइंट म्हणजेच 0.08% घसरून 61,716 आणि निफ्टी 58 अंक म्हणजेच 0.32% च्या कमजोरीसर 18,418 वर बंद झाला होता.

ब्रेंट क्रूड 84 डॉलरच्या पार
ब्रेंट क्रूडमध्ये तेजी वाढतच चालली आहे. ब्रेंट क्रूड 84 डॉलर प्रति बॅरलच्या पार पोहोचले आहे. ग्लोबल स्तरावर सप्लाय कंसर्नमुळे क्रूडच्या किंमतींना सपोर्ट मिळत आहे.

FII आणि DII डाटा
20 अक्टोबर म्हणजेच बुधवारी फॉरेन इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्स (FIIs) ने 505.79 कोटी रुपयांची विक्री केली. तर डोमेस्टिक इंस्टीट्यूशनल इन्वेस्टर्स (DIIs) ने 2578.22 कोटी रुपयांची विक्री केली.

बातम्या आणखी आहेत...