आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Budget 2021 2,23,746 Crore For Health And Proper Lifestyle, 137% More Than The Previous Budget

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आराेग्याला ‘बूस्टर डाेस’:आरोग्य आणि याेग्य जीवनशैलीसाठी 2,23,746 कोटी, मागील अर्थसंकल्पाच्या तुलनेत 137% अधिक

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शतकातील सर्वात मोठ्या महामारीविराेधात लढताना देशाच्या अर्थसंकल्पात सरकारचे लक्ष आरोग्य क्षेत्रावर होते. म्हणूनच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आरोग्य क्षेत्राला ‘बूस्टर डाेस’ची घोषणा केली. आरोग्य आणि याेग्य जीवनशैलीसाठी २,२३,८४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. गतवर्षीच्या ९४,४५२ कोटींपेक्षा ती १३७ % अधिक आहे. पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी पंतप्रधान स्वावलंबी आरोग्यदायी भारत योजना सुरू हाेईल. त्यावर सहा वर्षांत ६४,१८० कोटी रुपये खर्च हाेतील. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची तरतूद ६,२५७ कोटी रुपयांवरून वाढवून ७१,२६९ कोटी केली. त्याचबरोबर कोरोना लसीकरणासाठी ३५ हजार कोटींची तरतूद केेलेली आहे.

कोरोनाविरुद्ध युद्धात योग्य पावले उचलल्याचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, “स्वावलंबी भारताच्या सहा प्रमुख आधारस्तंभांमध्ये आरोग्य आणि देखभाल प्रमुख आहेत.” त्यांच्या पायाभूत सुविधांसाठी गुंतवणूक वाढवण्यात आली आहे. वापराबराेबरच निधीचे वाटपही वाढेल. रोग प्रतिबंध, उपचार आणि चांगले आरोग्य हे लक्ष्य आहे. ७० हजार गावांत आराेग्य केंद्रांना मदत दिली जाईल. स्वस्थ भारत योजनेसाठी ६४,१८० कोटींची तरतूद राष्ट्रीय आरोग्य अभियानाव्यतिरिक्त आहे. निधी वाढल्याने जास्त चांगल्या वैद्यकीय सुविधा आणि रोजगाराच्या संधी मिळतील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

आरोग्य क्षेत्राचा अर्थसंकल्प २.३७ पटींनी असा वाढला
आरोग्य व याेग्य जीवनशैलीसाठी २,२३,८४६ काेटींची तरतूद गेल्या वर्षीच्या तरतुदींपेक्षा २.३७ पट जास्त आहे. तथापि, आरोग्य मंत्रालयाच्या तरतुदींमध्ये केवळ दहा टक्केच वाढ झाली आहे. आरोग्य संशोधनासाठीच्या निधीमध्ये तुलनेत ५६३ कोटींनी वाढ करण्यात आली आहे. केंद्राच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत (पीएमजेवाय) याेजनेची तरतूद मागील वेळेइतकीच म्हणजे ६,४०० कोटी रुपये इतकीच ठेवली आहे.

२८,८१२ वेलनेस सेंटर, ६०२ अतिदक्षता केंद्रे
पंतप्रधान स्वावलंबी स्वस्थ भारत योजनेंतर्गत देशभरात २८,८१२ वेलनेस सेंटर असतील. त्यातील १७,७८८ गावांमध्ये आणि ११,०२४ शहरांमध्ये असतील. ११ राज्यांमधील सर्व जिल्ह्यांमध्ये एकात्मिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा ३,३८२ ब्लॉक पीएचसी, ६०२ जिल्ह्यातील अतिदक्षता केंद्र असलेली हॉस्पिटल आणि १२ केंद्रीय संस्था स्थापन केल्या जातील. आरोग्य सेवा आणि साथीच्या रोगांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा उभारण्याची रूपरेषा आखली जाईल.

सार्वजनिक आरोग्यासाठी वेबसाइट सुरू होईल
संसर्गजन्य रोगांचे निदान, प्रतिबंध आणि प्रतिबंध करण्यासाठी देखरेख व नियंत्रणासाठी एक मजबूत यंत्रणा असेल. तपासणी, अहवाल आणि देखरेखीसाठी ब्लॉकमधून जिल्हा व राष्ट्रीय पातळीवर लॅब उघडल्या जातील. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलची प्रादेशिक आणि २० शहरी आरोग्य देखरेख कार्यालयांचे जाळे असेल. सर्व राज्ये आरोग्य संकेतस्थळाशी जाेडली जातील. ३२ विमानतळ, ११ बंदरे, ७ सीमा चौक्यांवरील ३३ विद्यमान आरोग्य केंद्रे मजबूत करेल. १५ आपत्कालीन शस्त्रक्रिया केंद्र आणि २ फिरती रुग्णालये असतील.

डब्ल्यूएचओचे स्थानिक कार्य, ४ विषाणू संशाेधन केंद्रे
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडे (डब्ल्यूएचओ) दक्षिणपूर्व आशिया प्रदेशात प्रादेशिक संशोधनासाठी एक राष्ट्रीय आरोग्य संस्था, नऊ जैव-सुरक्षा पातळी-३ दर्जाच्या प्रयोगशाळा आणि चार प्रादेशिक राष्ट्रीय विषाणू संशाेधन संस्था असतील.

लसीकरणासाठी ३५ हजार काेटी रुपये
अर्थमंत्री म्हणाले, देशात काेराेना प्रतिबंधक दोन लसी आहेत. १०० पेक्षा जास्त देश लसींसाठी आपल्यावर अवलंबून आहेत. लसीकरणासाठी ३५ हजार कोटींंची तरतूद आहे. आवश्यकतेनुसार ती वाढविली जाईल.

देशभरात न्यूमोकोकल लस देण्यात येणार
न्यूमाेनिया रोखण्यासाठी भारतात बनविलेली न्यूमोकोकल लस केवळ पाच राज्यांपुरती मर्यादित आहे, ती देशभर दिली जाईल. त्यामुळे वर्षभरात ५० हजारपेक्षा जास्त मुलांचे मृत्यू राेखता येतील.

११२ जिल्ह्यांत मिशन न्यूट्रिशन २.०
कुपोषणाविरुद्धचा लढा बळकट करण्यासाठी पोषण अभियान, अतिरिक्त पोषण कार्यक्रम यांचे विलीनीकरण केले जाईल. ही याेजना न्यूट्रिशन २.० ला समर्थन देईल आणि देशभरातील ११२ जिल्ह्यांमधील पोषण वाढवेल.

बातम्या आणखी आहेत...