आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संसदेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय भाषण संपले आहे. यामध्ये कोणत्याही नवीन टॅक्स स्लॅबची घोषणा करण्यात आलेली नाही. मोदी कार्यकाळातील हे 9 वे बजेट आहे. बजेट भाषणानंतर बाजार रिकॉर्ड तेजीत आहेत. BSE सेन्सेक्स 2,020 अंकांच्या वाढीसह 48,306.59 वर व्यापार करत आहे. बाजारातील तेजीमध्ये बँकिंग सेक्टर सर्वात आघाडीवर आहेत. निफ्टीचे बँक इंडेक्स 7.21% च्या वाढीसह 32,768.70 वर व्यापार करत आहे. यात इंडसइंड बँक आणि ICICI बँकेच्या शेअरमध्ये 12-12% वाढ आहे. त्याचप्रमाणे निफ्टी निर्देशांक 563 अंकांच्या वाढीसह 14,198.40 वर ट्रेडिंग करत आहे.
BSE वर 2,981 शेअर्समध्ये व्यवहार होत आहे. 1,815 शेअर्स वधारले आणि 985 मध्ये घसरण झाली. लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप वाढून 191.47 लाख कोटी रुपये झाले आहे, जे शुक्रवारी 186.13 लाख कोटी रुपये होते. यापूर्वी बाजार सलग 6 सत्रांमध्ये घसरण होऊन बंद झाले होते.
फिस्कल डेफिसिट GDP चा 9.5% राहिल
सरकारने म्हटले की, 2020-21 साठी वित्तीय तूट जीडीपीच्या 9.5% असेल. 2021-22 साठी हे 6.8% असेल असा अंदाज आहे.
विमा साठ्यात मोठी वाढ
सरकार विमा कायद्या, 1938 मध्ये सुधारणा करेल. त्याअंतर्गत विमा कंपन्यांमध्ये FDI मर्यादा 49% वरून 74% करण्याची घोषणा केली गेली आहे. यामुळे HDFC लाइफचे शेअर्स 5.2%, SBI लाइफचे शेअर 3.8% आणि ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे शेअर्स 6.1%टक्क्यांनी वधारले आहेत.
गॅस कंपन्यांच्या शेअरमध्ये वाढ
अर्थमंत्री म्हणाल्या की, शहर गॅस वितरण अंतर्गत सरकार देशातील इतर 100 शहरांना जोडेल. यासह इंद्रप्रस्थ गॅसचे शेअर 2.5% आणि महानगर गॅसचे शेअर 1.8% ने वाढले आहे.
सेबी गोल्डचेही रेग्यूलेटर असेल
सरकार सिक्युरिटीज मार्केट कोड घेऊन येईल. यामध्ये सेबी अॅक्ट, गव्हर्मेंट सिक्युरिटीज अॅक्ट आणि डिपॉजिटरीज अॅक्टचा समावेश केला जाईल. सेबी गोल्डचेही रेग्यूलेटर असेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.