आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी टॅक्स देतो, बजेटमध्ये मला काय मिळाले:करदात्याचे हात यावेळीही रिकामेच, इनकम टॅक्सविषयी कोणताही दिलासा नाही

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकारने यावेळीही इनकम टॅक्समध्ये सर्वसामान्यांना कोणताही दिलासा दिलेला नाही. म्हणजेच सध्या जी आयकर प्रणाली आहे, त्यानुसार भविष्यातही तुम्हाला कर भरावा लागेल. मात्र, कर व्यवहार प्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे. या अंतर्गत आता तुम्हाला तुमचे दोन वर्षे जुने इन्कम टॅक्स रिटर्न अपडेट करण्याची सुविधा मिळेल.

अद्यापही 2.5 लाखांपेक्षा जास्त इनकम टॅक्स
यावेळी कर रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केवळ 2.5 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त असेल. जर तुमचे उत्पन्न 2.5 ते 5 लाख दरम्यान असेल तर तुम्हाला 5 लाख - 2.5 लाख रुपयांवर 5% कर भरावा लागेल. तसेच प्राप्तिकर कायद्याच्या कलम 87A चा लाभ घेऊन, तुम्ही अजूनही 5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावरील कर वाचवू शकाल.

सरकार 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5% दराने आयकर आकारते, परंतु आयकर कायद्याच्या कलम 87A अंतर्गत हा कर माफ करते. याचा अर्थ असा की जर एखाद्याचे वार्षिक करपात्र उत्पन्न 5 लाख रुपयांपर्यंत असेल, तर त्याला कोणताही आयकर भरावा लागत नाही, परंतु जर तुमचे उत्पन्न 5 लाख 10 हजार रुपये असेल, तर तुम्हाला 10 हजार रुपयांवर कर भरण्याऐवजी 5.10 लाख - 2.5 लाख = 2.60 लाखांवर टॅक्स द्यावा लागेल.

आयकर रिटर्न भरण्यासाठी सध्या 2 पर्याय आहेत
आयकर रिटर्न भरण्यासाठी म्हणजेच ITR फाइल करण्याचे 2 पर्याय मिळतात. नवीन पर्याय 1 एप्रिल 2020 रोजी देण्यात आला होता. नवीन कर स्लॅबमध्ये, 5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावरील कर दर कमी ठेवण्यात आला होता, परंतु डिडक्शन काढून घेण्यात आले होते. जर तुम्ही जुना टॅक्स स्लॅब निवडला तर तुम्ही विविध कर कपातीचा लाभ घेऊ शकता.

गेल्या 10 वर्षात आयकर स्लॅबमध्ये काय बदल झाले आहेत?
गेल्या काही वर्षांत कर स्लॅबमध्ये अनेक वेळा बदल करण्यात आले आहेत. 31 मार्च 2010 पूर्वी केवळ 1.60 लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त होते. जे 2011 मध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात 1.80 लाख रुपये करण्यात आले होते. त्यानंतर वेळोवेळी बदल करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...