आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड-19 महामारीनंतर भारतात कार विक्रीत १६% वाढीचे अनेक संकेत आहेत. स्पोर्ट््स युटिलिटी वाहनांच्या वाढत्या लोकप्रियतेने ट्रेंड पुढे वाढवला आहे. अनेकांसाठी ऑटोमोबाइल बूम देशाच्या सुपरफास्ट आर्थिक प्रगतीचे प्रतीक आहे. मोठ्या घसरणीनंतर दुचाकी वाहनांची विक्रीही वेगाने होत आहे. २८ फेब्रुवारीला जाहीर आकडेवारीनुसार २०२२ च्या अंतिम तिमाहीत भारताची जीडीपी ४.४% होती. ती गेल्या तिमाहीच्या ६.६%पेक्षा कमी आहे. मंद गती असूनही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज आहे की, २०२३ मध्ये भारत वेगाने वाढणारी मुख्य अर्थव्यवस्था असेल आणि जागतिक विकास दरात त्याचा वाटा १५% असेल. सत्ताधारी भाजपला वाटते की, देश अमृतकाळातून जात आहे. प्रत्येक जण भाजपच्या या दाव्याशी सहमत नाही. टीकाकारांना कारची वाढती विक्री भारताच्या आर्थिक विकासाचे एकतर्फी चित्र दाखवते. स्कूटर व मोटारसायकलीसारख्या दुचाकी वाहनांची विक्री २०१९ नंतर १५% घटली आहे. दुचाकी वाहने सर्वसामान्यांचे वाहन आहे. देशात अर्ध्या कुटुंबांकडे एक दुचाकी आहे, तर सरासरी दहापैकी एका व्यक्तीकडे कार आहे. दहा वर्षांपेक्षा जास्त काळापासून गरिबीचे अधिकृत अंदाज समोर आलेले नाहीत म्हणून सर्व्हे आणि वाहनांच्या विक्रीसारख्या डेटातून अंदाज लावले जातात. सेंटर फाॅर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)च्या ४४ हजार कुटुंबांच्या सर्व्हेत एक लाख रुपयांपेक्षा वार्षिक कमावणाऱ्या ६% कुटुंबांना वाटते की त्यांची स्थिती एक वर्षाच्या तुलनेत आज चांगली आहे. जानेवारीत महागाई ६.५% पर्यंत वाढली होती. सर्वाधिक प्रभाव गरिबांवर झाला आहे.
स्थिती सुधारत आहे सीएमआयई सर्व्हेनुसार गेल्या दोन वर्षांपासून बेरोजगारीचे प्रमाण ७%पेक्षा जास्त आहे. महामारीच्या प्रभावामुळे असे होणे शक्य आहे. शहरांमध्ये बांधकाम कंपन्यांना मजुरांच्या तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. महामारीत गावी गेलेले अनेक जण शहरात परतले नाहीत. मात्र, गेल्या काही काळापासून स्थिती सुधारत आहे. ताजे आकडे सांगतात की, गावांमध्ये मजुरी वाढली आहे. जनधन योजनेच्या बँक खात्यात जमा पैसे वाढले आहेत. दुचाकींची विक्रीही हळूहळू वेग घेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.