आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • But Less Than Last Year; The Decline In Petrol diesel Sales Is Due To Their High Prices; News And Live Updates

पेट्रोल-डिझेल विक्री वाढली:मात्र गेल्या वर्षीपेक्षा कमी; पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतील घट त्यांच्या जास्त किमतीमुळे

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जूनच्या पहिल्या पंधरवड्यादरम्यान भारतात पेट्रेाल आणि डिझेलची विक्री थोडी वाढली आहे. मात्र, ही अद्यापही २०१९ च्या समान अवधीच्या तुलनेत सुमारे २०% कमी आहे. गेल्या वर्षी जूनच्या तुलनेत पेट्रोल-डिझेलची विक्री अनुक्रमे ३.५% आणि ७.५% कमी आहे. पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतील घटीमागे याच्या उच्च किमती जबाबदार मानले जात आहे.

तेल विपणन कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जूनच्या १ ते १५ तारखेदरम्यान देशात सर्वात जास्त वापर होणारे इंधन पेट्रोल आणि डिझेलची विक्री १-१५ मेदरम्यान झालेल्या विक्रीच्या तुलनेत १३% जास्त झाली. पेट्रोलियम प्रॉडक्ट्सची मार्केटिंग करणाऱ्या तीन मोठ्या सरकारी कंपन्यांच्या आकडेवारीनुसार, पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत या वर्षी मार्चनंतर प्रथमच वाढ दिसली. गगनाला भिडणाऱ्या किमतीनंतरही भारतात पेट्रोल-डिझेलची विक्री वाढ जागतिक मागणीसाठी सकारात्मक संकेत मानला जात आहे.

यादरम्यान कच्च्या तेलाचे बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत ७० डॉलर प्रति बॅरलवर गेली आहे. यामुळे भारतात पेट्रोलची किंमत १०७ रुपयांपर्यंत पोहोचली आणि डिझेल १०० रु. प्रतिलिटरवर गेले आहे. पेट्रोल-डिझेलच्या विक्रीच्या मुद्‌द्यावर इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमच्या प्रवक्त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. देशात इंधनाची ९० टक्के विक्री या तीन सरकारी कंपन्या करतात.

बातम्या आणखी आहेत...