आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Business
 • Buyback Fills Investors' Pockets; 2 Lakh Crore In 5 Years, Not Just An IPO, But A Buyback In The Market; News And Live Updates

अॅनालिसिस:बायबॅकने भरली गुंतवणूकदारांची झोळी; 5 वर्षांत मिळाले 2 लाख कोटी, आयपीओच नव्हे, बाजारात बायबॅकची बहार

मुंबई, भोपाळ2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • सहा कंपन्यांच्या बायबॅक ऑफर खुल्या, 9800 कोटी शेअर्सची खरेदी

देशाच्या शेअर बाजारात केवळ आयपीओची बहार आली नाही, तर दीर्घावधीपासून बायबॅकचा पाऊसही पडत आहे. गेल्या पाच वर्षांत कंपन्यांनी ३०४ बायबॅक ऑफरद्वारे २.१३ लाख कोटी रुपयांहून जास्त मूल्याच्या शेअर्स खरेदीचा प्रस्ताव दिला. त्यांनी या माध्यमातून १.९८ लाख कोटी रुपयांचे शेअर खरेदीही केले. हे याआधीच्या १५ वर्षांत झालेल्या एकूण बायबॅकच्या आठपट जास्त आहे. २००० ते २०१५ दरम्यान कंपन्यांनी २५ हजार कोटी रुपयांचे शेअर बायबॅक केले होते. प्राइम डेटाबेसद्वारे गोळा केलेल्या आकडेवारीच्या विश्लेषणातून ही माहिती समोर आली आहे. शेअर बाजारात लिस्टेड एखादी कंपनी आपले शेअर आपल्याच शेअरधारकांकडून खरेदी करते, त्याला बायबॅक म्हटले जाते. त्यास आयपीओच्या उलट मानले जाते.

बायबॅकची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनीद्वारे खरेदी केलेल्या शेअर्सचे अस्तित्व संपुष्टात येते. बायबॅकसाठी प्रामुख्याने दोन पद्धती-टेंडर ऑफर किंवा ओपन मार्केटचा वापर केला जातो. कंपनीद्वारे शेअर बायबॅक केल्यावर त्याच्या व्यवसायात पायाभूत पद्धतीने कोणताही बदल येत नाही. विश्लेषणानुसार, रकमेच्या हिशेबाने सर्वात जास्त ५५,७४२.८३ कोटी रुपये मूल्याची बायबॅक ऑफर २०१७ मध्ये आली होती. त्या वर्षी ५० कंपन्यांनी या प्रस्तावाच्या माध्यमातून सर्वात जास्त ६९ बायबॅक ऑफर २०१९ मध्ये आले होते. याच्या माध्यमातून कंपन्यांनी ४३,९०४.३७ कोटीचे शेअर खरेदीचा प्रस्ताव दिला होता.

शेअरवर परिणाम

 • शेअर बाजारात ट्रेडिंगसाठी कंपनीच्या शेअर्सची संख्या घटते.
 • प्रति शेअर उत्पन्न(ईपीएस) वाढते. शेअरचा पीईही वाढतो.

शेअरधारकांचा फायदा

 • कंपनी बाजारभावापेक्षा जास्त किमतीवर शेअर खरेदी करते.
 • कंपनी शेअरची किंमत भविष्यात वाढण्याची शक्यता जास्त होते.

कंपनीचा फायदा

 • प्रवर्तकांचा हिस्सा वाढतो. अधिग्रहणाचा धोका कमी होतो.
 • अतिरिक्त रोकड घटते, अॅसेट्स वाढते. यामुळे आरओए वाढते.

कंपन्या का करताहेत बायबॅक?

 • चांगला नफा व नव्या गुंतवणूक योजनांतील घटीमुळे कंपन्यांकडे रोकड वाढली. ताळेबंदात रोकड वरकड होणे चांगले मानले जात नाही. ज्या कंपन्यांची नवी गुंतवणूक योजना नाही ते यास बायबॅकने शेअरधारकांना परतवत आहेत.

कंपनी आणि शेअरधारक दोन्हीसाठी फायदेशीर
शेअर बायबॅकमध्ये कंपनीला बहुतांश प्रकरणांत कोणतेही नुकसान होत नाही, उलट हे कंपनीवर नियंत्रण आणि प्रवर्तकांची मालकी वाढवण्यात फायदेशीर असते. कंपनी सरप्लस कॅशचा चांगला वापर करू शकते. दुसरीकडे, शेअरधारकांसाठी बहुतांश प्रकरणात हा फायद्याचा सौदा असतो. ते जास्त नफ्यात शेअर विकून गुंतवणुकीबाहेर निघू शकतात. -विनोद नायर, हेड ऑफ रिसर्च, जियोजित फायनान्शियल सर्व्हिसेस

बातम्या आणखी आहेत...