आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

खासगीकरण:मार्चपर्यंत 4 सरकारी बँका खासगी होणार; बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब अँड सिंध आदींची हिस्सेदारी विकणार

नवी दिल्ली / मुंबई2 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारने चार सरकारी बँकांना खासगी हातात सोपवण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे. पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्यांनी यासंदर्भात निर्देश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.

सरकार पंजाब अँड सिंध बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युको बँक आणि आयडीबीआय बँकेत आपली हिस्सेदारी विकू इच्छित आहे. सरकार या बँकांची हिस्सेदारी विकून कोरोना विषाणूमुळे कर संकलनातील तोट्याची भरपाई करू इच्छिते. यासाठी काही अन्य बँकांमध्येही सरकारी हिस्सेदारी विकली जाऊ शकते. पीएमओने वित्त मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात या वित्त वर्षात चारही बँकांची खासगीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे. असे असले तरी केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही.