आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Byju's Staff Will Be Reduced, Two And A Half Thousand Employees Will Be Removed, Information Byju CEO, Latest News And Update 

बायजू 2500 कर्मचारी काढणार:कंपनीचे CEO म्हणाले- कर्मचारी कपातीच्या निर्णयामुळे मला दुःख; मात्र, कंपनीच्या भविष्यासाठी निर्णय

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बायजू (Byju's) आपल्या 2500 कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे, कंपनीच्या संस्थापक तथा सीईओ बायजू रवींद्रन यांनी ही माहिती दिली. दरम्यान, कर्मचाऱ्यांना ईमेल लिहून या निर्णयाबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. ते म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांना बायजूचा निरोप घ्यावा लवागेल त्यांच्यासाठी मी खूप दुःखी आहे. यामुळे माझे हृदयाला वेदना होत आहेत, परंतू कंपनीला फायद्याच्या मार्गावर नेण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे कठोर निर्णय घेतला आहे.

मेलद्वारे मागितली सीईओंनी कर्मचाऱ्यांची माफी

कर्मचारी कपातीमध्ये बायजू (Byju's) सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रवींद्रन यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करित असल्याने कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. त्यांनी कंपनीच्या कर्मचार्‍यांना एका ईमेलमध्ये म्हटले आहे की, नफा कमावण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते.

बायजू रवींद्रन पुढे म्हणाले की, आर्थिक समस्यांमुळे त्यांना हा निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. जेणेकरून ते त्यांच्या कंपनीच्या स्थिरतेवर लक्ष केंद्रीत करू शकतील. मला त्या लोकांचे खूप वाईट वाटते, ज्यांना बायजू सोडावे लागलार आहे. माझ्या आयुष्यातील महत्त्वाचे लोक बाजूला जात असल्याचे रविंद्रन यांनी सांगितले.

कंपनीतील दुरुस्तीसाठी निर्णय घेण्याची वेळ

बायजू रवींद्रन यांनी सांगितले की, या आर्थिक वर्षात नफा मिळविण्यासाठी कंपनीकडून कठोर परिश्रम घेतले जात आहे. आमच्या ऑर्गेनिक आणि अनऑर्गेनिक वाढीमुळे आमच्या संस्थेत काही डुप्लिकेशन निर्माण झाले आहेत. जे ओळखणे आणि त्यातील दुरूस्ती करणे आवश्यक आहे. हे करण्यासाठी कंपनीचे पाच टक्के कर्मचारी म्हणजेच अडीच हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहोत. दरम्यान, फायद्यासाठी म्हणा किंवा नफ्याच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते, ज्यांना बायजूचा निरोप घ्यावा लागला त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटते. अशी भावना रवींद्रन यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...