आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिकटॉकला भारतात येण्याची घाई:रिलायन्स खरेदी करू शकते टिकटॉकचा भारतातील व्यवसाय, बाइटडान्सने मुकेश अंबानींच्या कंपनीशी सुरू केली चर्चा

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिलायन्स आणि बाइटडन्समध्ये जुलैच्या अखेरीस खरेदी-विक्री विषयी चर्चा सुरू झाली

यूजर्सच्या तुलनेत दुसरी मोठी बाजारपेठ राहिलेल्या भारतात परत येण्याची टिकटॉकला घाई झाली आहे. टिकटॉकची पॅरेंट कंपनी बाइटडान्स याच्या भारतातील व्यवसाय विकण्याची योजना आखत आहे. मीडिया रिपोर्ट्स नुसार, बाइटडान्स शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉकचा भारतीय व्यवसाय मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (आरआयएल)ला विकू शकते. या संबंधात दोन्ही कंपन्यांमध्ये जुलैच्या अखेरीस चर्चा सुरू झाली होती. परंतु, अद्याप या दोन्ही कंपन्या कोणत्याही करारापर्यंत पोहचल्या नाहीत. यावर रिलायन्स, बाइटडान्स आणि टिकटॉकने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

भारताने टिकटॉकसर चीनच्या 106 अॅपवर बंदी घातली आहे

लडाखच्या गलवान घाटीतील सीमावादानंतर भारत सरकारने चिनी कंपन्यांच्या 59 अॅपवर बंदी घातली होती. यामध्ये टिकटॉक, वीचॅट, अलिबाब ग्रुपचे यूसी ब्राउजर आणि यूसी न्यूज सारखे लोकप्रिय अॅपचा समावेश होता. यानंतर सरकारने मागील महिन्यात जुलैमध्ये चीनच्या 47 अॅपवर बंदी घातली होती. यापैकी बहुतांश पहिले बंदी घातलेल्या अॅपचे क्लोन होते. याप्रकारे भारताने आतापर्यंत चीनच्या 106 अॅपवर बंदी घातली आहे. टिकटॉकच्या भारतातील व्यवसायाचे मूल्य जवळपास 3 मिलियन डॉलर्स इतके आहे.

अमेरिकेतील व्यवसायासाठी मायक्रोसॉफ्ट-ट्विटरसोबत सुरू आहे चर्चा

भारतापाठोपाठ अमेरिकेतही टिकटॉक बंद होणार आहे. यासाठी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजुरी दिली आहे. टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय खरेदी करण्यासाठी सर्वातआधी मायक्रोसॉफ्ट कंपनी समोर आली होती. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी राष्ट्रपती ट्रम्प यांना याची माहिती दिली होती. ट्रम्प यांनी देखील या ऑफरचे समर्थन केले आहे. मायक्रोसॉफ्ट आणि बाईटडन्स यांच्यात टिकटॉकचा अमेरिकन व्यवसाय विकायचा कोणताही अंतिम करार झालेला नाही. दरम्यान, गेल्या आठवड्यात असेही वृत्त आले होते की, टिकटॉकचा अमेरिकन व्यवसाय खरेदी करण्यासाठी ट्विटर बाईटडन्सशीही चर्चे करत आहे. टिकटॉक यूएस व्यवसायाचे मूल्य जवळपास 30 बिलियन डॉलर आहे.

बाईटडन्सने 2019 मध्ये भारतात 43.7 कोटींची कमाई केली

2019 मध्ये बाईटडन्सने भारतात 43.7 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. कंपनीला 3.4 कोटी रुपयांचा नफा झाला. अमेरिकेतून कंपनीला 650 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. तर चीनकडून कंपनीला 2500 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. व्यवसाय उत्पन्नाच्या बाबतीत बाईटडन्सच्या पहिल्या 10 देशांमध्ये भारत नाही. 29 एप्रिलच्या डेटानुसार, जगभरात टिकटॉक 200 कोटी वेळा डाउनलोड केले गेले. जगभरात टिकटॉकचे 80 कोटी अॅक्टीव्ह युजर्स आहेत.

बातम्या आणखी आहेत...