आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Canada, The New Gateway To Illegal Entry Into The United States, Has 25% Indians

प्रवासी भारतीय:अमेरिकेत बेकायदा प्रवेशाचा नवा गेटवे कॅनडा, यात 25 % भारतीय

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

टोळीने १५३० फेऱ्या मारल्या आणि हजारो भारतीयांना प्रवेश मिळवून दिला. भारतीय लोक अमेरिकेच्या स्वप्नाच्या भानगडीत आपला जीवही धोक्यात घालत आहेत. या वर्षी २१ जानेवारी रोजी अमेरिकेपासून केवळ ३० फूट अंतरावर कॅनडामध्ये एका गुजराती कुटुंबातील चार लोकांचे मृतदेह बर्फात दबलेले आढळले. या कुटुंबाला बेकायदा पद्धतीने अमेरिकेत दाखल व्हायचे होते. अशात ते बर्फाच्या वादळात सापडले. यात एक अर्भक व एक किशोरवयीन मुलगाही होता. अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी अमेरिकन सीमेवर पेट्रोलिंग टीमने बुडणाऱ्या बोटीतून सहा भारतीयांना वाचवले. त्यांच्यावर बेकायदा पद्धतीने अमेरिके घुसखोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोषी आढळल्यानंतर त्यांना १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा दलाने एप्रिलमध्ये कॅनडातून अवैधरित्या येणाऱ्या १,१९७ भारतीयांना पकडले. ही संख्या या मार्गावर पकडल्या गेलेल्या एकूण लोकांच्या १३% आहे. अमेरिकेत अवैध घुसखोरीचा कॅनडा नवा गेटवे बनत आहे. एका अंदाजानुसार या मार्गे अवैधरित्या येणाऱ्या लोकांमध्ये भारतीयांचा वाटा २५-३०% आहे. वस्तुत: युएस-मेक्सिको सीमेवर कडक बंदोबस्त असतानाही लोक उत्तर सीमेकडे आकर्षित झाले आहेत. यावर्षी अवैधरित्या प्रवेश करताना पकडले गेलेले ४०% भारतीय कॅनडातून दाखल झाले. अवैधरित्या प्रवेश करताना पकडले गेलेले ८०% चीनचे, ९९% फिलीपीन्सचे नागरिक कॅनाडात घुसले होते.