आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रोकर्सकडून गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर केल्याच्या आशंका दूर करण्यासाठी सेबी पावले उचलत आहे. ट्रेडिंग सदस्य आणि ‘क्लिअरिंग कॉर्पोरेशन’ सदस्यांना दिवसाच्या शेवटी गुंतवणूकदारांचे पैसे रोखणे आणि त्याच दिवशी संपूर्ण रक्कम क्लिअरिंग कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित करण्याचा नियम सेबीने प्रस्तावित केला आहे. सध्या, गुंतवणूकदार ब्रोकरकडे पैसे ठेवतो तेव्हा एक भाग ब्रोकर आणि एक भाग क्लिअरिंग कॉर्पोरेशनच्या सदस्याकडे असतो. उर्वरित रक्कम क्लिअरिंग कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित केली जाते. एका कन्सल्टेशन पेपरमध्ये, सेबीने स्टॉक ब्रोकर्स आणि क्लिअरिंग सदस्यांकडे पडून असलेले सर्व गुंतवणूकदारांचे पैसे दररोज क्लिअरिंग कॉर्पोरेशनकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत या प्रस्तावावर लोकांकडून सूचना मागवल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.