आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागणी सुधारल्यामुळे टायर निर्मात्यांचा भांडवली खर्च या आर्थिक वर्षात सुमारे ५ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. मागील दोन आर्थिक वर्षांत हा खर्च वार्षिक सुमारे ३,७०० कोटी रुपये होता असे क्रिसिलने या पतमानांकन संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.
निर्यातीबराेबरच वाहने बदलणे, व्यावसायिक आणि प्रवासी वाहने यांसारख्या विभागांमुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे टायर निर्मात्यांची क्रेडिट प्रोफाइल “स्थिर’ राहण्याची अपेक्षा आहे असे या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल देशातील सहा अव्वल टायर उत्पादकांच्या विश्लेषणावर आधारित आहे. ज्यांचा या क्षेत्रातील ७५,००० कोटी रुपयांपैकी ८० टक्के वाटा असल्याचे क्रिसिलने म्हटले आहे. तथापि, क्षमता वापर अजूनही ७०-७५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याने चालू आर्थिक वर्षात भांडवली खर्च हा २०१८ आणि २०२० मधील सरासरी सुमारे ६,२०० कोटी रुपयांच्या वार्षिक सरासरीपेक्षा कमी असेल असे त्यात म्हटले आहे. दरम्यान, टायर कंपन्यांमधील उत्पादन परिणाम स्वरूपात या आर्थिक वर्षामध्ये गेल्या आर्थिक वर्षातील १२-१४ टक्क्यांच्या तुलनेत ६ ते ८ टक्क्यांपर्यंत कमी होऊन २.५ दशलक्ष टनांवर जाण्याची शक्यता आहे.
सेमीकंडकक्टर तुटवडा, कच्च्या मालाच्या किमतीवर होणारा परिणाम चिंताजनक
क्रिसिलच्या मते, आर्थिक मंदी आणि कोविड १९ साथीच्या आजारामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. महामारीच्या पुढच्या लाटा, सेमीकंडक्टरची सतत कमतरता (ज्याचा प्रवासी वाहनांच्या मागणीवर परिणाम होऊ शकतो) आणि कच्च्या मालाच्या किमतींवर होणारा परिणाम याकडेही लक्ष द्यावे लागेल असा सावध इशाराही क्रिसिलने दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.