आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीत घट:फेब्रुवारीत कार विक्रीत 7%, दुचाकीत 27 टक्क्यांनी घट

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रातिनिधीक संग्रहीत छायाचित्र  - Divya Marathi
प्रातिनिधीक संग्रहीत छायाचित्र 

सेमीकंडक्टरचा तुटवडा, कच्च्या मालाची महागाई, लॉजिस्टिकच्या दरात झालेली वाढ आणि नवीन नियमांमुळे खर्चात झालेली वाढ यांचा परिणाम देशातील वाहनांच्या घाऊक विक्रीवर दिसून येत आहे. फेब्रुवारी महिन्यात कारच्या विक्रीत ७ टक्क्यांनी, तर दुचाकींच्या विक्रीत २७ टक्क्यांनी घट झाली आहे.

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) या वाहन उत्पादकांच्या संघटनेने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी २०२१ मध्ये २८१,३८० कारची विक्री झाली. परंतु त्यांची संख्या फेब्रुवारीमध्ये २६२,९८४ पर्यंत घसरली. त्याचप्रमाणे, दुचाकींची विक्रीही फेब्रुवारी २०२१ मध्ये १४,२६,८६५ च्या तुलनेत १०,३७,९९४ पर्यंत घसरली आहे.

पुरवठ्याच्या आव्हानांमुळे वाहनांच्या विक्रीत घट
फेब्रुवारी २०२२ मध्ये वाहनांच्या घाऊक विक्रीत घट झाली आहे. सेमीकंडक्टरचा तुटवडा, नवीन नियमांमुळे होणारा खर्च, वाढत्या वस्तूंच्या किमती, लॉजिस्टिक खर्चात वाढ यासारख्या पुरवठ्याच्या बाजूच्या आव्हानांचा ऑटो उद्योगाच्या एकूण विक्रीवर परिणाम झाला आहे. - राजेश मेनन, महासंचालक, सियाम

बातम्या आणखी आहेत...