आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारची विक्रीत वाढ:नोव्हेंबरमध्ये कारची विक्री 14% वरून 102% पर्यंत वाढली

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नोव्हेंबरमध्ये कारांच्या विक्रीत वार्षिक १४%वरुन १०२% पर्यंत उसळी आली. ह्युंदाई मोटरची विक्री ३६%, महिंद्रा अँड महिंद्राची ५६%, किआ इंडियाची विक्री ६९% आणि एमजी मोटर्सची विक्री ६४% वाढली. श्कोडा ऑटो इंडियाची विक्रीत सर्वात जास्त १०२% वाढ झाली. फक्त टोयोटा किर्लोस्करच्या कंपनीच्या विक्रीत १०% घसरण झाली. देशाच्या सर्वात मोठ्या कार कपंनी मारुती सुझुकीच्या विक्रीत गेल्या महिन्यात १४ टक्क्याची वाढ झाली. मारुतीने नोव्हेंबरमध्ये १.५९ लाख कार विकल्या. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने आपल्या डिलर्सला १.३९ लाख कारांचा पुरवठा केला होता.

देशाची सर्वात दुसरी मोठी कार कपंनी हुंदाई मोटर इंडियाची विक्री नोव्हेंबरमध्ये ६४,००४ च्या पातळीवर पोहोचली होती. नोव्हेंबर २०२१ मध्ये त्यांनी ४६९१० कार डीलर्सना विकल्या होत्या. तिसरी सर्वात मोठी कार कंपनी टाटा मोटर्सच्या विक्रीत २१% वाढ झाली आहे. कंपनीने गेल्या महिन्यात ७५,४७८ कार विकल्या. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये हा आकडा ६२,१९२ होता. देशाची चौथी मोठी कार निर्माती महिंद्रा अँड महिंद्राच्या विक्रीत ५६ टक्क्याची वाढ झाली.

बातम्या आणखी आहेत...