आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
ईव्ही म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती पेट्रोल वाहनांपेक्षा थोड्या जास्त आहेत. भारतात ईव्हीच्या प्रति लोकांमध्ये जास्त नसल्यामागचे मोठे कारण हेही आहे. मात्र, इन्व्हेस्टमेंट बँकर मॉर्गन स्टॅनलीच्या एका अहवालानुसार, पेट्राेलच्या वाढत्या किमती आणि ईव्हीसाठी पायाभूत सुविधा तयार होण्याने आता इलेक्ट्रिक दुचाकी स्वस्त पडत आहे. अहवालानुसार, इलेक्ट्रिक दुचाकी चालवणे आता पेट्रोल दुचाकीच्या तुलनेत ५ टक्के स्वस्त पडत आहे.
मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालानुसार देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहेत. सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला पेट्रोलच्या वाढत्या किमतीचा बोजा पडत आहे. हे ओझे कमी करण्यात इलेक्ट्रिक वाहन साहाय्यभूत होऊ शकते. मात्र, सध्या बाजारात विकणाऱ्या दुचाकींची तुलना केल्यास पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या तुलनेत ते २०-२५% महाग आहेत. मात्र, ज्या पद्धतीने पेट्रोलचे भाव वाढत आहेत ते पाहता इलेक्ट्रिक वाहन चालवण्याचा खर्च वर्षभरात पेट्रोल वाहनाच्या तुलनेत ५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. अहवालानुसार, जगात कच्च्या तेलाचे दर जे काही असतील, भारतात पेट्रोल डिझेलच्या किमती ७०-८० रुपयापेक्षा कमी होतील. याच्या तुलनेत विजेवर चार्ज होणारी बॅटरी स्वस्त पडू शकते. अहवालानुसार, इलेक्ट्रिक वाहनांसाठी पायाभूत विकास झाल्यावर हा खर्च आणखी कमी होईल. याशिवाय इलेक्ट्रिक वाहनांची देखभालही पेट्रोल वाहनांच्या तुलनेत स्वस्त पडते. पेट्रोलवरील वाहनांच्या तुलनेत या जास्त काळ टिकतात.
ईव्ही टू-व्हीलर, पेट्रोल टू-व्हीलरपेक्षा कशी स्वस्त ते पाहा
विवरण इलेक्ट्रिक टू-व्हीलर पेट्रोल टू-व्हीलर
वाहनाची किंमत 115,000 83,893
टिकते 10 वर्षे (अंदाजित) 10 वर्षे (अंदाजित)
वार्षिक खर्च ( @ 10%) 11,500 ₹8,389
वार्षिक वीज/इंधन खर्च ₹2,127 12,483
वार्षिक देखभाल + िवमा ₹3,000 ₹4,300
बॅटरी बदलण्याचा वार्षिक खर्च ₹7,500 0₹0
एकूण वार्षिक खर्च 24,127 ₹25,173
खर्च प्रति किमी ₹3.4/किमी ₹3.5/किमी
स्रोत: मॉर्गन स्टॅनली
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.