आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठोर धोरण:2 महिन्यांत 43% घटली रोकड; निधीसाठी बँका वाढवतील दर

मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिझर्व्ह बँकेने यंदा मेपासून आतापर्यंत तीन हप्त्यात रेपो रेट १.४०% वाढवून ५.४०% केला आहे. यामुळे देशातील बँकिंग सिस्टिममध्ये सरप्लस लिक्विडिटी म्हणजे अतिरिक्त रोकडमध्ये मोठी घट झाली आहे. याआधी मे ते जूनदरम्यान दोन वेळा रेपो रेट ०.९०% वाढवला होता. यामुळे बँकिंग सिस्टिममध्ये सरप्लस लिक्विडिटी आधीच ४३.२८% कमी झाली असून आता त्यात आणखी घट होईल. यामुळे बँकांना ठेवींवरील दर वाढवावे लागतील. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी सांगितले की, जून–जुलैत सरप्लस लिक्विडिटी म्हणजे बँकांमध्ये अतिरिक्त रोकड ३.८ लाख कोटी रुपये झाली. त्या तुलनेत एप्रिल– मेदरम्यान बँकिंग सिस्टिममध्ये ६.७ लाख कोटी रुपयांची सरप्लस लिक्विडिटी होती. बँकर्सच्या नुसार यामुळे डिपॉझिट रेट्स वाढवण्याचा दबाव वाढेल. आरबीआयच्या निर्णयामुळे एकीकडे कर्ज घेणाऱ्यांचा खिसा जास्त रिकामा होईल, तर ठेवीदारांचे व्याजाचे उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.

बँकिंग सिस्टिममध्ये सतत घटली अतिरिक्त रोकड महिना सरप्लस ऑगस्ट– सप्टेंबर 2021 9.96 एप्रिल-मे 2022 6.70 जून-जुलै 2022 3.80 ऑगस्ट-सप्टेंबर 2022 1.50* (लिक्विडिटीचे आंकड़े लाख कोटीत , *अंदाजे)

मदन सबनवीस, चीफ इकॉनॉमिस्ट, बीओबी बँकिंग सिस्टिममध्ये उरणार नाही अतिरिक्त रोकड मेपासून आतापर्यंत धोरणात्मक दरांबाबत आरबीआयचे धोरण राहिले आहे, त्याचे तीन परिणाम समोर येतील

कॅश इकाॅनॉमीवर : आरबीआय हळूहळू बँकिंग सिस्टिममधून अतिरिक्त रोकड पूर्णपणे काढून घेईल. यामुळे कॅश इकॉनॉमीबाबत देश स्थिर होईल. ही अशी स्थिती असेल, ज्यात बँकांकडे फक्त आवश्यक किमान रोकड असेल. बँकांवर : बँकांकडे अतिरिक्त रोकड नसेल. मात्र, कर्जाची मागणी डिपॉझिट ग्रोथच्या तुलनेत जास्त असेल असे होऊ शकते. यामुळे बँकांसाठी पुरेसा निधी जमवणे कठीण होईल. यामुळे बाँड यील्ड वाढू शकतो. सर्वसामान्यांवर : बँकांना कर्ज देण्यासाठी निधी जमवण्यासाठी ठेवींवर दर वाढवावे लागतील. यामुळे ठेवीदारांना फायदा होईल. मात्र रेपो रेट वाढण्याबरोबरच एमसीएलआर वाढतो, यामुळे कर्जे महाग होतात.

बातम्या आणखी आहेत...