आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लॉकडाउनच्या काळात कामकाज ठप्प असल्याने आर्थिक मदत म्हणून सरकारकडून गरीब महिलांच्या खात्यामध्ये 500 रुपये दरमहा जमा केले जात होते. ठरल्याप्रमाणे गेल्या आठवड्यातच ही योजना संपली. परंतु, आता पंतप्रधान कार्यालय ही योजना जूनपर्यंत सुरूच ठेण्यासाठी प्रयत्नशील आहे. पंतप्रधान कार्यालय यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ही योजना जून महिन्यानंतरही वाढवली जाऊ शकते. केंद्रातील बडे अधिकारी ही योजना वाढवण्याच्या पक्षात आहेत.
20 कोटी गरीब महिला योजनेच्या लाभार्थी
आर्थिक परिस्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी पंतप्रधान जन धन बँक खात्यांच्या माध्यमातून गरीब महिलांच्या खात्यांमध्ये दरमहा 500 रुपये जमा करण्याची योजना लागू करण्यात आली होती. यामध्ये 20 कोटी गरीब महिलांच्या जन धन खात्यात पैसे जमा करण्यात आले. गेल्या आठवड्यातच महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा शेवटचा हप्ता जमा करण्यात आला. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेसाठी ग्रामविकास मंत्रालयाच्या माध्यमातून बजेट उपलब्ध करून दिले जात आहे.
पीएमओ घेणार अंतिम फैसला
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेची मुदत वाढवण्यासंदर्भात अंतिम निर्णय पंतप्रधान कार्यालय घेणार आहे. पीएमओची या योजनेला मंजुरी मिळाल्यास त्याचा दुसरा टप्पा सुरू केला जाईल. किमान उत्पन्न घटकातील लोकांना याचा फायदा होईल.
50 टक्के लाभार्थींनी रक्कम काढलीच नाही
या योजनेच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत जेवढ्या महिलांच्या बँक खात्यांमध्ये दरमहा 500 रुपये जमा करण्यात आले. त्यापैकी केवळ 50 टक्के महिलांनीच यातील पैसे काढले आहे. उर्वरीत महिलांच्या बँक खात्यांमध्ये ती रक्कम होती तशीच आहे. योजनेच्या अंतर्गत एप्रिल, मे आणि जून महिन्यासाठी महिलांच्या जन धन खात्यांमध्ये 20 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. केंद्र सरकारने कोरोनाशी दोन हात करण्यासाठी 1.7 लाख कोटी रुपयांच्या मदत निधीची घोषणा केली होती. यात सामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा करण्यात आल्या. त्यातच जनधन खात्यांच्या लाभार्थी महिलांसाठी तीन महिने दरमहा 500 रुपये जमा केले जाणार असे सांगण्यात आले होते.
देशभर 38 कोटी जन धन बँक खाते
नुकतेच जारी करण्यात आलेल्या नीति आयोगाच्या आकडेवारीनुसार, देशात जन धन बँक खात्यांची संख्या आता 38 कोटी झाली आहे. आयोगाच्या माहितीप्रमाणे, यातील 53 टक्के जन धन खाते हे महिलांच्या नावे आहेत. हे बँक खाते शून्य रकमेवर उघडले जातात. यात किमान रक्कम ठेवण्याची अट नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.