आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष पथक:अवैध वाळूची वाहतूक करणारे टिपर पकडला ; सिद्धेश्वर वरणगावकर यांनी विशेष पथक निर्माण केले

संग्रामपूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध वाळूची वाहतूक करणारे टिपर महसूल पथकाने पकडले. ही कारवाई आज ९ जून रोजी सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास करण्यात आली आहे. तालुक्यातील वान नदी पात्रातून वाळूचे उत्खनन करुन व महसूल विभागावर वाळू माफिया करवी पाळत ठेऊन त्यांचे लोकेशन घेत अवैध वाळूची वाहतूक सर्रास सुरु आहे. दरम्यान, या चोरट्या वाळू तस्करीला आळा घालण्यासाठी तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी विशेष पथक निर्माण केले. दरम्यान, आज सकाळी या पथकाने वरवट बकाल येथील संस्थेच्या एका गोदामाच्या मागे अवैध वाळूची वाहतूक करताना एम. एच. २८ /बीबी /१६४० या क्रमांकाच्या टिप्परला पकडले. यावेळी टिप्पर मध्ये एक ब्रास अवैध वाळू आढळून आली. नायब तहसीलदार एच. एन. उकर्डे यांच्या पथकातील तलाठी पी. व्ही. खेळकर, तलाठी एस. ए. गाडे, ए. आर. खरे यांनी पंचनामा करून वाहन मालक गजानन विश्वनाथ वखारे यांचे बयान घेत वाहन जप्तीची कारवाई केली. त्यानंतर हे टिपर तामगाव पोलिस ठाण्यात जमा करण्यात आले. महसूल विभागाचे लोकेशन घेऊन अवैध वाळूची वाहतूक केली जाते. तालुक्यातील पूर्णा, वाण नदी यासह इतर नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू वाहतूक सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...