आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • CCI Approves Reliance Acquisition Of METRO Cash; The Competition Commission Of India | METRO

रिलायन्स-मेट्रो डीलला स्पर्धा आयोगाची मंजुरी:2,850 कोटी रुपयांचा करार, कंपनीला  मिळेल 31 लार्ज फॉरमॅट स्टोअर्सचा अ‍ॅक्सेस

नवी दिल्ली17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडच्या(RRVL) फूड होलसेलर मेट्रो कॅश अँड कॅरी इंडियाच्या अधिग्रहणात मान्यता दिली आहे. डिसेंबर 2022 मध्ये RRVL आणि मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया यांच्यात करार झाला. हा करार 2,850 कोटी रुपयांचा आहे. मेट्रो ही एक जर्मन कंपनी आहे जिने 2003 मध्ये भारतात आपले व्यवसाय सुरू केला होता. कॅश-अँड-कॅरी व्यवसायाचे स्वरूप त्यांनी सादर केले होते.

प्राइम लोकेशन स्टोअर्सचा मिळेल अ‍ॅक्सेस

या संपादनासह रिलायन्स रिटेलला दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, कोलकाता, अमृतसर, अहमदाबाद, सुरत, इंदूर, मेरठ, लखनऊ, नाशिक, विशाखापट्टणम, गुंटूर, विजयवाडा, तुमाकुरू, गाझियाबाद आणि हुबळी येथे प्राइम मेट्रो स्थानांवरील स्टोअर्सचा अ‍ॅक्सेस मिळेल. कराराचा भाग म्हणून, रिलायन्स रिटेलला नोंदणीकृत किराणा स्टोअर्स, संस्थात्मक ग्राहक आणि मजबूत पुरवठादार नेटवर्कचा मोठा आधारदेखील मिळेल.

कंपनीचे 31 लार्ज फॉरमॅट स्टोअर्स

RRVL ला मेट्रोच्या HoReCa (हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि केटरर्स) ग्राहकांच्या नेटवर्कमध्येही प्रवेश मिळेल. या इंटरनॅशनल फूड होलसेलरचे देशातील 21 शहरांमध्ये अंदाजे 3,500 कर्मचारी असलेली 31 मोठी फॉरमॅट स्टोअर्स आहेत. आर्थिक वर्ष 22 मध्ये आतापर्यंत मेट्रो इंडियाने 29.8 दशलक्ष युरोची विक्री गाठली आहे. या संपादनामुळे रिलायन्स रिटेलच्या फिजिकल स्टोअर फूटप्रिंटला आणखी बळकटी मिळेल.

छोट्या उद्योगांना करणार मदत

रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालिका ईशा अंबानी म्हणाल्या, “मेट्रो इंडिया भारतीय B2B बाजारपेठेतील एक अग्रणी आणि प्रबळ खेळाडू आहे आणि ग्राहकांना मजबूत अनुभव देण्यासाठी एक मजबूत मल्टी-चॅनल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. आम्हाला विश्वास आहे की, भारतीय व्यापारी/किराणा इको-सिस्टिम आणि मेट्रो इंडियाच्या निरोगी मालमत्तेबद्दलची आमची सखोल माहिती भारतातील लहान व्यवसायांना भरभराटीस मदत करेल.'

RRVLचे वाढणार नेटवर्क

METRO कॅश अँड कॅरी इंडियाचेचे अधिग्रहण केल्याने RRVL चे नेटवर्क आणखी विस्तारेल. त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये ज जिओ मार्ट, आजिओ, नेटमेड्स आणि जिवामेसारखे इतर ओम्नी चॅनल बिझनेस आधीपासूनच आहेत. 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी RRVL ची एकत्रित उलाढाल अंदाजे 1,99,704 कोटी रुपये आणि निव्वळ नफा अंदाजे 7,055 कोटी रुपये होता.

बातम्या आणखी आहेत...