आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • CCI's Online Food Deposit Order; Alleged Violation Of Rules, DG Will Submit Report Within 60 Days

झोमॅटो-स्विगीची होणार चौकशी:सीसीआयचे ऑनलाइन फुड जमा करण्याचे आदेश; नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप, डीजी 60 दिवसांत करणार अहवाल सादर

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय आयोगाने (CCI) स्विगी आणि झोमॅटो या ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपन्यांच्या ऑपरेशन आणि बिझनेस मॉडेल यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. कायदा कलम 3(1) आणि 3(4) चे उल्लंघन केल्याप्रकरणी हे आदेश देण्यात आले आहेत. सीसीआयने आपल्या आदेशात महासंचालक (डीजी) यांना या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली असुन चौकशी करून 60 दिवसांत आयोगाला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

एनआरएआयने दाखल केली तक्रार
नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (NRAI) ने गेल्या वर्षी जुलैमध्ये स्विगी, झोमॅटो यांनी नियनांचे उल्लंघन केल्याने यांच्यावर आरोप केला होता. NRAI ने आरोप केला की, हे ऑनलाइन फूड एग्रीगेटर सखोल सवलत, विशेष टाय-अप आणि रेस्टॉरंट भागीदारांना प्राधान्य देतात जे नियमांचे उल्लंघन करते. याचा हॉटेल व्यवसायावर परिणाम होतो. NRAI देशभरातील 50,000 हून अधिक रेस्टॉरंट ऑपरेटर्सचे प्रतिनिधित्व केले असल्याचे समोर आले आहेय

कोविड-19 महामारीच्या काळात ऑनलाईन फुडची जास्त प्रमाणात विक्रि झाली. तसेच याच्या अनेक चर्चा होऊनही, रेस्टॉरंट चालकांच्या चिंता दूर करण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. NRAI ने सांगितले की रेस्टॉरंट्सकडून 20% - 30% कमिशन आकारले जाते, जे खूप जास्त आहे. या फूड एग्रीगेटर्सवर त्यांच्या प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केलेल्या रेस्टॉरंट्सकडून ऑर्डर मूल्याच्या सुमारे 27.8% शुल्क आकारले जात असल्याचा आरोप आहे, क्लाउड किचनसाठी कमिशन दर 37% पर्यंत आहे.

10 मिनिटे उशीर झाल्याने कोणताही दंड नाही - दीपेंद्र गोयल
कंपनीचे संस्थापक दीपेंद्र गोयल यांनी सांगितले होते की, कंपनी आपल्या डिलिव्हरी भागीदारांवर अन्न जलद वितरीत करण्यासाठी दबाव आणत नाही. नवीन मॉडेलचे स्पष्टीकरण देताना गोयल म्हणाले की 10 आणि 30 मिनिटांच्या डिलिव्हरीमध्ये उशीर झाल्यास कोणताही दंड नाही आणि वेळेवर जाण्यासाठी कोणतेही प्रोत्साहन दिले जाणार नाही. फक्त ब्रेड ऑम्लेट, पोहे, कॉफी, चहा, बिर्याणी, मोमोज यांसारखे खाद्यपदार्थ नवीन सेवेत जोडले जातील. अस स्पष्ट वक्तव्य दीपेंद्र गोयल यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...