आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • CCPA Action For Selling Substandard Pressure Cookers, Amount To Be Refunded To Consumers

फ्लिपकार्टला एक लाखांचा दंड:निकृष्ट प्रेशर कुकर विक्री केल्याने सीसीपीएची कारवाई, ग्राहकांना परत करावी लागणार रक्कम

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा दंड फ्लिपकार्टला निकृष्ट दर्जाच्या (गुणवत्तेच्या मानकांची पूर्तता न करणारे) घरगुती प्रेशर कुकर विक्री केल्याबद्दल लावण्यात आला आहे. CCPA नुसार, फ्लिपकार्टने त्याच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारचे प्रेशर कुकर विक्री करुन 1 लाख 84 हजार 263 रुपये कमावले आहेत.

सीसीपीएच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी सांगितले की, फ्लिपकार्टला त्यांच्या प्लॅटफॉर्मवर निकृष्ट प्रेशर कुकर विकल्याबद्दल आणि ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल एक लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. कंपन्यांनी विक्री केलेले 598 प्रेशर कुकर परत मागवून ग्राहकांचे पैसे परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय कंपनीला 45 दिवसांत अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

ई-कॉमर्स कंपनी अ‌ॅमेझॉनला या महिन्याच्या सुरुवातीला प्रेशर कुकर विकल्याबद्दल 1 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. जे गुणवत्ता मानकांची पूर्तता करत नाहीत. याशिवाय, यावर्षी मार्चमध्ये, CCPA ने ई-कॉमर्स कंपनी पेटीएम मॉल आणि स्नॅपडीलला सेट मानदंडांकडे दुर्लक्ष करून प्रेशर कुकर विकल्याबद्दल प्रत्येकी 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला. कंपन्यांनी विकलेले हे प्रेशर कुकर परत मागवून ग्राहकांनी भरलेली रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले होते. सरकारने प्रेशर कुकरसाठी गुणवत्ता नियंत्रण आदेश (QCO) जारी केला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना इजा आणि नुकसान होण्याचा धोका टाळण्यासाठी मानक चिन्ह वापरण्यास सांगितले आहे. IS 2347:2017 मानकांनुसार घरगुती प्रेशर कुकर तयार केलेले असावे.

बातम्या आणखी आहेत...