आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायरिंग आऊटलूक:यंदा सिमेंट, रिटेल, स्टील, दूरसंचार, ऑटो कंपन्या करतील भरती : ईवाय

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कपात आणि एआयच्या प्रभावात जॉब मार्केटचे चित्र चांगले

बाजाराची अनिश्चितता, कपात आणि एआयचा प्रभाव असूनही जॉब मार्केटचे चित्र चांगले दिसून येत आहे. भारतीय कंपन्या विवेकशीलतेने भरती करत आहेत. या वर्षी सिमेंट आणि स्टील क्षेत्राचा समावेश आहे. त्यांना पायाभूत सुविधांवर होणाऱ्या खर्चाचा फायदा होईल. तसेच ऑटो कम्पोनेंट्स, अक्षय ऊर्जा, आरोग्य सेवा, रिटेल, दूरसंचार, लॉजिस्टिक्स ही अशी क्षेत्रे आहेत ज्यात नोकऱ्यांमध्ये भरभराट होऊ शकते. तर ईव्ही आणि ई कॉमर्सशी संबंधित स्टार्टअपच्या हायरिंगमध्ये वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. व्यावसायिक सेवा पुरवणारे फर्म अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) च्या मार्च २०२३ च्या “फ्यूचर ऑफ पे’ अहवालातून ही माहिती समोर आली. त्या क्षेत्रांचा उल्लेख करण्यात आला, ज्यात यंदा भरती होऊ शकते. टीमलेज सर्व्हिसेसने उत्पादन आणि सेवा क्षेत्रात नुकताच एक सर्व्हे केला. यात कंपन्यांनी एप्रिल- जून २०२३ मध्ये एक वर्षाच्या आधीच्या तुलनेत भरतीच्या हेतूत १०% वाढ होण्याची माहिती दिली.

आरोग्य सेवा, उत्पादन आणि टेकमध्ये कुशल गुणवत्तेचा तुटवडा ईवायने त्यांच्या अहवालात आरोग्य सेवा, उत्पादन आणि तंत्रज्ञानासारख्या क्षेत्रात कुशल गुणवत्तेच्या तुटवड्याचा उल्लेख केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, लाइफ सायन्सेस सारख्या विशिष्ट क्षेत्रात मागणी- पुरवठ्या दरम्यान असमतोल आहे. यामुळे या क्षेत्रांत नोकऱ्यांची संधी व वेतन दोन्ही वाढत आहेत.