आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Central Bank Of India Introduced Immune India Deposit Scheme For Those Who Get Vaccinated, Vaccine Recipients Will Get 0.25% To 0.50% Higher Interest On FD

लस घ्या, जास्त व्याज मिळवा:लस घेणाऱ्या प्रत्येकाला FD वर मिळेल 0.25% ते 0.50% जास्त व्याज, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने काढली स्कीम

नवी दिल्ली9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी, यासाठी बँकेची स्कीम

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तर, देशातील लसीकरणही वेगाने होत आहे. या लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता आणण्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने एक स्कीम आणली आहे. या स्कीम अंतर्गत ज्या लोकांनी लस घेतली आहे, त्यांना FD वर ज्यास्त व्याज मिळेल. जाणून घ्या या स्कीमबद्दल...

काय आहे स्कीम?

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने फिक्स्ड डिपॉझिट स्कीम लॉन्च केली आहे. या स्कीमचे नाव 'इम्यून इंडिया डिपॉझिट' आहे. या स्कीम अंतर्गत फिक्स्ड डिपॉझिट (FD) केल्यावर चालू व्याज दरावर 0.25% जास्त लाभ मिळेल.

कुणाला मिळेल फायदा ?

कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तीला या स्कीमचा फायदा घेता येईल. त्यांना चालू व्याज दरापेक्षा 0.25% ज्यास्त व्याज मिळेल. तसेच, कोरोना लस घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांना 0.50% जास्त व्याज दिले जाईल. लस न घेणाऱ्यांना या स्कीमचा फायदा घेता येणार नाही.

कधीपर्यंत मिळेल याचा फायदा ?

बँकेने सोशल मीडिया पोस्टमध्ये या स्कीमबद्दल माहिती दिली आहे. स्कीमचा मॅच्योरिटी पीरियड 1,111 दिवसांचा आहे. ही स्कीम ठराविक काळासाठी लॉन्च केली आहे. कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तीला या स्कीमचा फायदा घेता येईल. त्यांना चालू व्याज दरापेक्षा 0.25% ज्यास्त व्याज मिळेल. तसेच, कोरोना लस घेणाऱ्या जेष्ठ नागरिकांना 0.50% जास्त व्याज दिले जाईल. बँकेने सांगितले की, जास्तीत जास्त लोकांना लस घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही स्कीम लॉन्च केली आहे.

FD वर 5.1% पर्यंत व्याज देते सेंट्रल बँक

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया सध्या 7 दिवस ते 10 वर्षापर्यंतच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 2.75 ते 5.1% पर्यंत व्याज देते.

सलग दुसऱ्या दिवशी 1.60 लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळले

देशात कोरोनाचा वेग सलग वाढवणारा आहे. सोमवारी 1 लाख 60 हजार 694 नवीन रुग्ण आढळले. 96,727 बरे झाले आणि 880 जणांचा मृत्यू झाला. हा सलग दुसरा दिवस होता जेव्हा नवीन रुग्ण 1 लाख 60 हजारांपेक्षा जास्त आढळले. रविवारी 1 लाख 59 हजार 914 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

बातम्या आणखी आहेत...