आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याची मागणी वाढली:केंद्रीय बँकांनी विकत घेतले 399 टन सोने; 4.4 पट जास्त

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक अनिश्चिततेदरम्यान आरबीआयसारख्या जगभरातील केंद्रीय बँकांनी सोन्याचा खजिना वाढवला आहे. जुलै-सप्टेंबर तिमाहीत त्यांनी ३९९.३ टन सोने विकत घेतले. ते गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत विकत घेतलेल्या ९०.६ टन सोन्यापेक्षा ४.४ पट जास्त आहे. एका दशकाहून अधिक काळातील एका तिमाहीत केंद्रीय बँकांनी केलेली ही सर्वात मोठी सोन्याची खरेदी आहे. जागतिक सोने परिषद (डब्ल्यूजीसी)च्या ताज्या अहवालानुसार, २०२२च्या आधी नऊ महिन्यांत सेंट्रल बँकांची सोन्याची मागणी वाढवून ६७३ टन झाली. ते २०१८ मध्ये ६५६.६ टन सोन्याच्या विक्रमी खरेदीपेक्षाही २.५% जास्त आहे. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्ञात खरेदीदारांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. यादरम्यान आरबीआयने परकीय चलनाच्या साठ्यात १७.५ टन सोन्याची भर घातली. आरबीआयने एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२२ दरम्यान सर्वाधिक १३२.४ टन सोन्याची खरेदी केली.

अजय केडियांच्या मते,केंद्रीय बँकांची सोने खरेदी वाढणे हे सकारात्मक चिन्ह आहेत. यामुळे सोन्याच्या किमतीला सपोर्ट मिळेल. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे प्रादेशिक सीईओ पीआर सोमसुंदरम म्हणाले, केंद्रीय बँका सोने खरेदी करणे सुरू ठेवतील.

केंद्रीय बँकेने विकत घेतले सोने ? केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडियांच्या मते, डॉलरच्या तुलनेत स्थानिक चलनाला मदत म्हणून केंद्रीय बँक सोने विकत घेत आहे. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत डॉलर इंडेक्स १६% वाढला. त्यामुळे वाढलेली जोखीम कमी करण्यासाठी केंद्रीय बँक सोन्याचा साठा वाढवत आहे.

२०१८ मध्ये सर्वात जास्त सोने विकत घेतले वर्ष प्रमाण 2018 656.2 2019 605.4 2020 254.9 2021 453.8 2022* 673.0

एप्रिल २०२०पासून आरबीआय सर्वात मोठी खरेदीदार

देश प्रमाण भारत 132 थाईलैंड 90 जापान 81 हंगरी 63 ब्राजील 62 (स्रोत: जागतिक सोने परिषद)

*(सुरुवात तीन तिमाहीत, प्रमाण टनमध्ये)

..परंतु गोल्ड ईटीएफमधून ९ वर्षांत विक्रमी पैसे काढले केंद्रीय बँकांच्या खरेदीच्या उलट जागतिक सोने ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड)मधून ९ वर्षांत विक्रमी पैसे काढले गेले. डब्ल्यूजीसीच्या मते, सप्टेंबर तिमाहीत ईटीएफमधून २२७ टन सोने काढले.

बातम्या आणखी आहेत...