आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानव्या वर्षात कर्ज महागणार नाही. रेपो रेटमध्ये जास्तीत जास्त ०.२५% वाढ होईल. त्यानंतर दीर्घकाळपर्यंत रिझर्व्ह बँकेचे दर स्थिर राहतील. तज्ज्ञांनुसार, अशीही शक्यता आहे की, २०२३ च्या अखेरपर्यंत व्याजदरात घट सुरू होईल. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे देशात रेपो रेट महागाई दरापेक्षा ०.३७% जास्त झाला आहे. तांत्रिकदृष्ट्या याला रिअल सेंट्रल बँक रेट म्हटले जाते. ते शून्याच्या वर असल्यास रिझर्व्ह बँक दर वाढवणे बंद करते.
बँक ऑफ बडोद्याचे अर्थतज्ज्ञ अदिती गुप्तांनी सांगितले की, सध्या भारतासह ५ मोठ्या देशांत रिअल सेंट्रल बँक रेट शून्याच्या वर आहे. चीन, सौदी अरब, ब्राझील आणि मेक्सिकोचा यात समावेश आहे. गुप्ता यांच्यानुसार, रिअल सेंट्रल बँक रेट शून्याच्या खाली आल्यावर चलनाचे मूल्य घटू लागते. महागाई वाढल्यावर रिझर्व्ह बँक रेपो रेट वाढवू लागते, म्हणजे रिअल सेंट्रल बँक रेट शून्याच्या वर राहील.
२०२३-२४ मध्ये ५% पेक्षा थोडी जास्त
कोटक इक्विटीजनुसार, रिझर्व्ह बँक पुढील वर्षी दर वाढवण्याआधी रेपो रेटमध्ये केलेल्या २.२५% वाढीचा पूर्ण परिणाम बघेल. ब्रोकरेज फर्मने एका नोटमध्ये म्हटलंय, आमचा अंदाज आहे की, २०२३ मध्ये आरबीआय रेपो रेट ६.२५-६.५% वर स्थिर ठेवेल.
कठीण स्थितीतून भारत बाहेर आला
^विकसित देशांमध्ये व्याजदर आणखी वाढण्याची शक्यता कायम आहे. अशा बहुतांश देशांमध्ये महागाई दर ७-१०% आहे. या तुलनेत सेंट्रल बँकांचे रेट्स २.५०-४.५०%च आहे. हे अंतर भरून काढण्यासाठी त्यांना व्याजदर वाढवावे लागतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.