आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआंतरराष्ट्रीय बाजारातून ज्या सरासरी किमतीवर कच्चे तेल खरेदी करत आहे त्या तुलनेत रशियातून आलेले क्रूड गेल्या वर्षी जूनमध्ये १६ डॉलरनी स्वस्त होते. हा फरक १३१० रुपये प्रतिबॅरल आहे. मागील वर्षी एप्रिल ते या वर्षी मार्चपर्यंत ते सरासरी ७ डॉलर म्हणजे ५७३ रुपये प्रतिबॅरल अधिक आहे. गेल्या महिन्यात भारताने आवश्यक ३९ टक्के तेल रशियाकडून खरेदी केले. तरीही सुमारे १० महिन्यांपासून पेट्रोल व डिझेलचे दर स्थिर आहेत. चला, समजून घेऊयात कसे...
1. गैरपारदर्शक सूत्र : इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम पेट्रोल आणि डिझेलचे दर जगभरातील इंधन दरांवरून निश्चित करते, क्रूडच्या दरांवर नव्हे. युरोपसारख्या बाजारात हे इंधन खूप महाग झाले आहे. परिणामी भारतातही पेट्रोल-डिझेलचे दर उच्च स्तरावरच आहेत.
2. तूट भरून काढण्यासाठी बचतीचा वापर : सरकारी रिफायनिंग कंपन्या रशियन तेलाच्या आयातीतून बचतीचा वापर तोटा कमी करण्यासाठी करत आहेत. या कंपन्यांचा दावा आहे की, सरकारकडून निश्चित भावावर स्वयंपाकाच्या गॅससारखे उत्पादन विक्री केल्याने त्यांना तोटा होत आहे.
3. सरकारी धाेरण : खर्चापेक्षा कमी किमतीत एलपीजी विकून कंपन्यांना झालेला तोटा भरून काढण्यासाठी सरकारने केवळ २२,००० कोटी रुपये सबसिडी दिली आहे. कंपन्यांचा दावा आहे की, वास्तविक नुकसान याच्या दुप्पट आहे. याची भरपाई त्यांना स्वत: करावी लागत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.