आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नोटबंदीनंतर सुस्तावलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला आगामी सणासुदीत घसरणीतून सावरण्याची आशा निर्माण झाली आहे. विकासकांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाकाळात स्वत:चे घर असावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या लोकांमध्ये गेल्या पाच वर्षांत मालमत्ता सर्वात स्वस्त किमतीत व आतापर्यंतच्या सर्वांत स्वस्त गृह कर्जामुळे घर खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विकासकांनी ऑफर्सची तयारी सुरू केली आहे. रिअल इस्टेट व्यावसायिकांची संघटना क्रेडाई आणि नारडेको दोघांच्या अंदाजानुसार, कोरोनामुळे रिअल इस्टेट क्षेत्रात जो अडथळा आला तो आता दूर होईल. नवरात्रीत संपूर्ण देशात रिअल इस्टेटमध्ये सर्वात जास्त बुकिंग होते. या वेळीही मालमत्तेची चांगली बुकिंग होण्याची शक्यता आहे. हाउसिंग डॉट कॉम आणि प्रॉपटायगर समूहाने बुधवारी जारी केलेल्या इनसाइट “क्यू३-२०२०’ अहवालात रिअल इस्टेटमध्ये तेजीचे संकेत देत आहे. अहवालानुसार, एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत जुलै-सप्टेंबर तिमाहीत घरांची विक्री ८५ टक्के वाढली आहे. प्रॉपटायगर व हाऊसिंग.कॉमचे ग्रुप सीईओ ध्रुव अग्रवाल यांनी सांगितले की, अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांची स्थिती आता सुधारत आहे. आगामी सण रिअल इस्टेट क्षेत्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. यामुळे येत्या १२ महिन्यांच्या मागणीचे चित्र स्पष्ट होईल. तज्ज्ञांनुसार, विक्रीचा ट्रेंड पाहता सर्वात अधिक मागणी ४५ लाखांपर्यंत किमतीच्या रेडी टू पझेशन घरांची राहील, असे मानले जाते.
सर्वकाही सर्वात स्वस्त, त्यामुळे घर खरेदीची ही योग्य वेळ
स्वत:चे घर खरेदी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांसाठी तज्ञ सध्याची वेळ योग्य असल्याचे सांगत आहेत. तज्ञांनुसार, गेल्या पाच वर्षांपासून घराच्या किमती स्थिर आहेत. गृह कर्जावर व्याज दर १५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत.
महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशने मुद्रांक शुल्क कपात केली आहे. यासोबत गृह कर्ज सर्वात स्वस्त आहे. केवळ महाराष्ट्रात सप्टेंबरमध्ये रजिस्ट्री कार्यालयातील आकडे उत्साहवर्धक वाटतात. या सणातही जास्त घरे विकण्याची अपेक्षा आहे. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्र नवरात्रीत घर खरेदीसाठी चांगला पर्याय सादर करत आहे.
सुधारणेचा मार्ग : वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत दुसऱ्यात २४६% विक्री वाढली
स्वत:चे घर असणे आपल्यासाठी भौतिक आणि भावनिक सुरक्षेसाठी किती महत्त्वाचे आहे हे कोरोनाकाळाने दाखवून दिले. घरांच्या कमी किमती, स्वस्त गृह कर्ज घर खरेदीसाठी प्रोत्साहित करत आहेत. - ध्रुव अग्रवाल, ग्रुप सीईओ, प्रॉपटायगर व हाउसिंग डॉट कॉम
वर्क फ्रॉम होममुळे भाड्याच्या घरात राहणारे स्वत:चे घर खरेदी करत आहेत. महाराष्ट्राचा विचार केल्यास सप्टेंबर महिन्यातील घरांच्या विक्रीची आकडेवारी खूप उत्साहवर्धक आहे. या सणासुदीतही जास्त घरे विकण्याची अपेक्षा आहे. -डॉ. निरंजन हिरानंदानी, राष्ट्रीय अध्यक्ष, नारेडको
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.