आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Chief Minister Eknath Shinde Inaugurated A Two day Regional Conference On 'e Governance' In Mumbai

मुंबईत ‘ई-गव्हर्नन्स’वर दोन दिवसीय प्रादेशिक परिषद:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारचा प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने (डीएआरपीजी) आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने, २३ ते २४ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथे “ई-गव्हर्नन्स” या विषयावर दोन दिवसीय क्षेत्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.

देशभरातील ५०० हून अधिक प्रतिनिधी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने उपस्थित राहतील. परिषदेत २० राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील ५०० प्रतिनिधी होणार सहभागी होणार आहेत. या परिषदेत संस्थांचे डिजिटल परिवर्तन आणि नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी या क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चा होणार आहे. ई-सेवा, डिजिटल व्यासपीठ आणि ई-प्रशासन मॉडेल्स सुधारण्याच्या मार्गांवर प्रतिनिधी चर्चा करणार आहेत. सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिव, (सामान्य प्रशासन विभाग) सुजाता सौनिक आणि डीएआरपीजीचे सचिव व्ही. श्रीनिवासदेखील उद्घाटन सत्राला संबोधित करतील. समारोप सत्रादरम्यान केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परिषदेला संबोधित करतील. अतिरिक्त सचिव अमर नाथ आणि सचिव व्ही. श्रीनिवास या सत्रात मार्गदर्शन करतील.

डिजिटल संस्था- डिजिटल सचिवालये विषयावर सादरीकरण
दुसऱ्या दिवशी होणाऱ्या पाचव्या सत्रात महाराष्ट्राचे भारतीय लोक प्रशासन संस्थेचे निवृत्त आय ए एस अधिकारी स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखालील ‘डिजिटल संस्था – डिजिटल सचिवालये’ या विषयावर सादरीकरणे केली जातील. सहाव्या सत्रात अ‍ॅक्टचे संदीप सिंघल आणि पपिलफर्स्टचे सह-संस्थापक संजय विजयकुमार, यांच्या अध्यक्षतेखाली “ई-गव्हर्नन्समधील स्टार्ट-अप्स” या विषयावर सादरीकरण केले जाईल.

बातम्या आणखी आहेत...