आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराचीनमध्ये कोरोनाचे संकट अतिशय झपाट्याने वाढत आहे. पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाने रौद्ररूप धारण केले आहे. त्यामुळे जगभरातील देशांमध्ये अलर्ट जारी केला जात आहे. यामध्येच भारतीय शेअर बाजारात बुधवारी घसरण दिसून आली आहे. मात्र, धक्कादायक बाब म्हणजे आरोग्य क्षेत्राशी संबंधित असलेले समभागांमध्ये गुंतवणूक अतिशय झपाट्याने वाढली आहे. यात विशेष करून हेल्थ सेक्टर व रुग्णालयाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्स खरेदीत वाढ होताना दिसून आली आहे. आजच्या मार्केटमध्ये डॉ. लाल पॅथलॅब्स लिमिटेड ते विजया डायग्नोस्टिक सेंटरपर्यतचे शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
कोणत्या शेअर्समध्ये झाली वाढ
आज बुधवारी सकाळपासूनच शेअर बाजारात डॉ. लाल पॅथलॅब्स लिमिटेडने शेअर्समध्ये 6 टक्के वाढ झाली आहे. तर मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड मध्ये 3 टक्के खरेदीत वाढ झाली. तर विजया डायग्नोस्टिक सेंटर लिमिटेडमध्ये 3.16 टक्क्यांची वाढ झाली आहे.
शेअर बाजाराची क्लोजिंग बेल
आठवड्यातील तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे बुधवारी शेअर बाजारात सुरूवातीला वाढ दिसून आली. मात्र, 600 अंकांनी घसरून निफ्टी 18,200 पातळीवर पोहोचला, तर सेन्सेक्समध्ये 30 पैकी 19 समभागांध्ये घसरण पाहायला मिळाली. तेल आणि वायू, वीज, रियल्टी सेक्टर टॉप लूजर्स राहीले आहेत. प्रत्येक सेक्टरमध्ये 2 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली आहे.
मंगळवारीही बाजारात घसरण राहीली
आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी (20 डिसेंबर) शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 103 अंकांनी घसरून 61,702 वर बंद झाला. निफ्टी 35 अंकांनी वाढून 18,385 च्या पातळीवर पोहोचला. सेन्सेक्समधील 30 पैकी 21 समभागांमध्ये घसरण झाली. त्याच वेळी, केवळ 9 समभागांना गती मिळाली.
कोरोनावरून भारतात अलर्ट
पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. चीनमध्ये कोरोनाचा स्फोट पाहायला मिळतोय. त्यामुळे संपूर्ण जग पुन्हा एकदा हायअलर्टवर आहे. भारतातही विशेष काळजी घेतली जात आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी भारतात पुन्हा मास्क बंधनकारक करण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे म्हटले. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
चीनच्या परिस्थितीवरून भारतात आधीच खबरदारी म्हणून उपाययोजना करण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कालच मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसूख मांडवीय यांनी आज कोरोना संदर्भात निर्णय घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे. चीनमधील कोरोनाचा उद्रेक पाहता भारताची पुढची पावलं काय असतील, त्याची रूपरेषा काय असेल यासंदर्भात आज बैठकीत निर्णय घेतला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.