आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आले सत्य:चीन रहस्यमय खरेदीदार; चलन वापरून 300 टन सोने खरेदी केले

मुंबई7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 400 टन सोन्याची खरेदी झाली, सेंट्रल बँकांनी 100 टन खरेदी केले, बाकीचा तपशील नाही

चीनने जुलै-सप्टेंबर तिमाहीत िजतके सोने विकत घेतले, त्याच्या तुलनेत खूपच कमी खरेदीची माहिती सार्वजनिक केली. काही जागतिक तज्ज्ञांच्या मते, चीन सोन्याचा “मिस्ट्री बायर’ आहे. म्हणजेच चीन सोने विकत घेत आहे. मात्र सत्य जगापासून लपवत आहे. खरं तर, जागतिक सुवर्ण परिषद (डब्ल्यूजीसी)ने या महिन्यात एक अहवाल प्रसिद्ध केला होता की, सप्टेंबर तिमाहीत जगभरातील सेंट्रल बँकांनी बरेच सोने विकत घेतले होते.या अहवालात सांगण्यात आले होते की, एका मिस्ट्री बायरने मोठ्या पातळीवर सोने विकत घेतले आहे. मात्र डब्ल्यूजीसीने त्याची ओळख सांगितली नव्हती. गुरुवारी आलेल्या निक्केईच्या अहवालात सांगण्यात आले होते की, तो मिस्ट्री गोल्ड बायर चीन असू शकतो. या अहवालात सोन्यासारख्या किमती धातूचे तज्ज्ञ कोइशिरो कमेईच्या मते, चीनने गेल्या तिमाहीत जेवढे सोने खरेदी केले.

गेल्या तिमाहीत ७५% गोल्ड बाइंग गुप्त निक्केईच्या मते, सप्टेंबर तिमाहीत सुमारे ४०० टन सोने विकत घेतले होते. हे एप्रिल-जून तिमाहीच्या तुलनेत दुप्पट आणि जानेवारी-मार्च तिमाहीच्या तुलनेत सुमारे चार पट आहे. विशेष म्हणजे, सेंट्रल बँकांनी यापासून सुमारे १०० टन सोेनेच विकत घेतले. इतर ३०० टन (७५%) सोन्याची खरेदी कुणी केली.

रशियाकडून सोने विकत घेतोय चीन मार्केट विश्लेषक इतसू तोशिमा, निक्केईला म्हणाले, “चीन जे सोने खरेदी करत आहे, रशियाकडून येत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, चीनकडे १९४८.३१ टन सोनेे. सोन्याच्या साठ्याच्या बाबतीत चीनचा जगात सहावा क्रमांक लागतो.

असे का करताेय चीन ? केडिया अॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणाले की, चीनचे अमेरिकेसोबतचे संबंध सतत बिघडत आहेत. दरम्यान, जागतिक अर्थव्यवस्थेबाबतही अनिश्चितता वाढली आहे. अशा परिस्थितीत डॉलरवर अवलंबून न राहता चीन गुपचूप सोने खरेदी करत आहे. केडियाच्या म्हणण्यानुसार, युक्रेनवर हल्ल्यापूर्वी रशियाने अशीच तयारी केली होती.

बातम्या आणखी आहेत...