आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने मारली बाजी:चीन बनला जगातील सर्वात श्रीमंत देश, अमेरिकेलाही टाकले मागे; 20 वर्षात जगातील संपत्ती 3 तर चीनची संपत्ती 16 पटींनी वाढली

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या अमेरिकेला मागे टाकत चीन जगात सर्वाधिक श्रीमंत देश झाला आहे. जगभरातील देशांवर नजर ठेवणाऱ्या मॅनेजमेंट कंसल्टंट मॅकिन्जे अॅण्ड कंपनीच्या रिसर्चनुसार, मागील 20 वर्षात जगभरातील संपत्तीत तीन पटीने वाढ झाली आहे.मात्र या वाढीत चीनचा वाटा 1/3 म्हणजेच सुमारे 33% इतका आहे. चीनची संपत्तीत सुमारे 16 पटीने वाढ झाली आहे.

रिपोर्टनुसार, सन 2000 साली संपुर्ण जगाची संपत्ती 156 ट्रिलियन डॉलर इतकी होती. दोन दशकानंतर त्यात वाढ होऊन 2020 मध्ये 514 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे. तर सण 2000 मध्ये चीनची संपत्ती 7 ट्रिलियन डॉलर होती, त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होऊन 2020 मध्ये 120 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे.

अमेरिकेच्या संपत्तीत दोन पटीने वाढ
मागील 20 वर्षांच्या कार्यकाळात अमेरिकेच्या संपत्तीत दोन पटीने वाढ झाली आहे. 2020 मध्ये अमेरिकेची संपत्ती 90 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे. अहवालात असे म्हटले आहे की, येथील मालमत्तेच्या किंमतीत फारशी वाढ न झाल्यामुळे अमेरिकेची संपत्ती चीनपेक्षा कमी राहिली आणि त्यांनी आपले पहिले स्थान गमावले.

चीन आणि अमेरिकेच्या संपत्तीचा मोठा हिस्सा काही लोकांपर्यंत मर्यादित आहे
रिसर्चनुसार, चीन आणि अमेरिकेतील संपत्तीचा मोठा वाटा काही श्रीमंत लोकांपर्यंतच मर्यादित आहे. या दोन्ही देशांमध्ये फक्त 10% श्रीमंतापैकींच सर्वाधिक संपत्ती आहे. मात्र या दोन्ही देशात श्रीमंताचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे देशात गरीब आणि श्रीमंत असे दोन वर्ग पाहायला मिळत आहे.

एकूण मालमत्तेच्या 68% स्थावर मालमत्ता
अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की. एकूण जागतिक संपत्तीपैकी 68% संपत्ती रिअल इस्टेटच्या स्वरूपात अस्तित्वात आहे, तर उर्वरित संपत्तीमध्ये पायाभूत सुविधा, यंत्रसामग्री आणि उपकरणे यांचा समावेश आहे.

चीनची एकूण संपत्ती भारताच्या 8 पटीने जास्त आहे

क्रेडिट सुईसच्या ग्लोबल वेल्थ रिपोर्टनुसार, भारताची एकूण संपत्ती ऑक्टोबर 2019 मध्ये 12.6 ट्रिलियन डॉलर इतकी होती. जे चीनच्या 120 ट्रिलियन डॉलरच्या एकूण संपत्तीच्या 8 पट कमी आहे. तथापि, 2019 पासून भारताच्या निव्वळ संपत्तीबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

बातम्या आणखी आहेत...