आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • China's Stricter Laws Benefit India, US Tech Companies Including Google Facebook Have Invested Rs 1.27 Lakh Crore In India So Far

गुंतवणुकीचे नवीन डेस्टिनेशन:चीनच्या कठोर कायद्यांचा भारताला फायदा, गूगल-फेसबुकसह अमेरिकन टेक कंपन्यांनी भारतात आतापर्यंत केली 1.27 लाख कोटींची गुंतवणूक

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुकेश अंबानी यांच्या जिओ प्लॅटफॉर्म्सला 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक मिळाली

2020 च्या सुरुवातीपासून आतापर्यंत अमेरिकेतील मोठ्या टेक कंपन्यांची भारतात गुंतवणूक करण्याची चढाओढ लागली आहे. या कंपन्यांनी जानेवारीपासून 15 जुलैपर्यंत भारतात 17 अब्ज डॉलर (1.27 लाख कोटी रुपये)ची गुंतवणूक केली आहे. या कंपन्यांमध्ये अॅमेझॉन, फेसबुक आणि गूगलसारख्या कंपन्या सामील आहेत. 

कोणत्या कंपनीने किती गुंतवणूक केली

अमेरिकेतील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने जानेवारीमध्ये 1 अब्ज डॉलर (7400 कोटी रुपये)च्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. यानंतर फेसबुकने एप्रिलमध्ये 6 अब्ज डॉलर (44 हजार कोटी रुपये) च्या गुंतवणुकीची घोषणा केली. यानंतर गूगलने मागच्या आठवड्यात, 15 जुलैला 10 अब्ज डॉलर (75 हजार कोटी रुपये) गुंतवण्याची घोषणा केली.

एका रात्रीत बदलत नाही परिस्थिती

भारतात होत असलेली गुंतवणूक एका रात्रीत झाली नाही. काही महिन्यांपूर्वीपर्यंत अमेरिकन टेक कंपन्यांचा भारतीय रेगुलेटर्ससोबत वाद सुरू होता आणि त्यांच्या सीईओला दिल्लीला यावे लागले होते. पण, तेव्हापासून आतापर्यंत परिस्थिती बदलली आहे. कोरोना व्हायरसमुळे जगाची अर्थव्यवस्था मंदावली आहे, भारतालाही याचा फटका बसला आहे.

याशिवाय टेक क्षेत्राबाबत भारत आणि चीनमधील तनाव वाढला आहे. भारतासोबत येत अमेरीकेच्या राष्ट्राध्यक्षांनीही चीनी अॅप्सवर अविश्वास दर्शवला आङे. अखेर चीन आणि हॉन्गकॉन्गकडून मिळत असलेल्या आव्हांनांचा सामना करण्यासाठी अमेरिकन टेक कंपन्यांसाठी भारत पहिली पसंत बनला आहे.

अमेरिकन कंपन्यांच्या आवडीची दुसरी बाजू ही पण...

भारतात टेक कंपन्यांची गुंतवणुकीची दुसरी बाजी भारताची डिजिटल इकोनॉमी आहे. भारतात अंदाजे 70 कोटी इंटरनेट यूजर आहेत. यातील अंदाजे अर्धे ऑनलाइन आले आहेत. हा एक मोठा फायदा आहे. अमेरिका-भारत बिजनेस काउंसिलमध्ये टेक पॉलिसीचे हेड जे गुलिस सांगतात की, टेक कंपन्यांना विश्वास आहे की, भारतात टेकसाठी चांगला बाजार मिळेल.

चीन एक मोठे कारण आहे

सिलिकॉन व्हॅलीतील अनेक कंपन्या चीनला सोडत आहेत. यासाठी चीनचा सेंसरशिप मॅकेनिज्म जबाबदार आहे. याशिवाय चीनकडून हॉन्गकॉन्गमध्ये लादला गेलेला सुरक्षा कायदाही मोठे कारण आहे. नवीन सुरक्षा कायदा हॉन्गकॉन्गच्या अथॉरिटीला टेक प्लॅटफॉर्म्सला रेगुलेट करण्याची ताकद देतो. यात चीनच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण होणाऱ्या पोस्ट्सला डाउन करने सामील आहे.