आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्पादन बंद:चिनी कंपनी हुआवेने भारतात मॅन्युफॅक्चरिंग करणे टाळले

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेलीकॉम उपकरण बनवणारी दिग्गज कंपनी हुआवेने संयुक्त उपक्रमाद्वारे भारतात उत्पादन सुरू करण्याची योजना तूर्तास पुढे ढकलली. या चिनी कंपनीला प्रामुख्याने भारतात टेलिकॉम गियर बनवायचे होते. तज्ञांच्या मते, ५जी सेवेची लाँचिंग दरम्यान हुअावे भारतीय कंपनीसोबत मिळुन संयुक्त उद्योग स्थापित करण्याची योजना आखत होती. यामध्ये तंत्रज्ञान हस्तांतरणाचा समावेश आहे. परंतु भारतातील स्वतःच्या भविष्याबाबत अनिश्चिततेमुळे हुआवेने ही योजना थांबवली आहे. खरं तर, कंपनीच्या विरोधात करसंबंधित समस्या आहेत. आतापर्यंत कंपनीला विश्वसनीय स्त्रोतांची मान्यता मिळालेली नाही. सरकारने नियमात सुधारणा केली. ज्या अंतर्गत दूरसंचार ऑपरेटर केवळ विश्वसनीय स्त्रोतांकडून टेलिकॉम उपकरणे खरेदी करू शकतील. संबंधित अधिकारी विश्वसनीय स्रोत असल्याचे प्रमाणपत्र देईल.

बातम्या आणखी आहेत...