आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रा यांचा योगी बाबा कोण?:अर्थ मंत्रालयातील एखादा अधिकारीच असु शकतो चित्रा यांचा 'योगी बाबा', त्याच्या सांगण्यावरुनच घेत होत्या सर्व निर्णय

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका योगीच्या इशाऱ्यावरुन अनेक वर्षांपर्यंत नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे मोठे निर्णय घेतले जात होते, पण या योगीबद्दल कोणालाच माहिती नाही. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की, या कथित योगीचा ना हिमालयाशी संबंध आहे आणि ना तो बाबा आहे. चित्रा रामकृष्ण यांचे करियर उज्ज्वल करण्यामागे अर्थ मंत्रालयातील एखादा ब्यूरोक्रेट होता अशी शक्यता वर्तवली जात आहे.

NSE च्या माजी CEO चित्रा रामकृष्ण यांच्यावर एका आध्यात्मिक गुरूसोबत गोपनीय माहिती शेअर केल्याचा आरोप आहे. 11 फेब्रुवारी रोजी सेबीने रामकृष्ण यांना दंड ठोठावला होता. मार्केट रेगुलेटर एक्सचेंजची गोपनीय माहिती एखाद्या अज्ञात व्यक्तीसोबत शेअर केल्याबद्दल चित्रा यांच्यावर 3 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

चित्रा रामकृष्ण
चित्रा रामकृष्ण

या प्रकरणाची योग्य चौकशी होणे गरजेचे आहे
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास केला तरच काहीतरी समोर येण्याची शक्यता आहे. अन्यथा, त्याचे भवितव्यही को-लोकेशन घोटाळ्याच्या तपासासारखे होईल आणि योगीपर्यंत पोहोचणे कठीण होईल. या प्रकरणी एनएसईच्या आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी केली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. को-लोकेशन घोटाळा 2015 मध्ये समोर आला होता. यामध्ये सेबीने एनएसईला दंड आकारून सोडले होते.

योगीसोबत मेलवर व्हायचे रामकृष्ण यांचे बोलणे
सेबीला योगी यांच्या ईमेलवरील संभाषणावरुन कळले आहे की, या व्यक्तीला NSE च्या कामकाजाची पध्दत आणि अधिकाऱ्यांची प्रत्येक गोष्ट माहिती होती. आनंद हा बाहेरचा माणूस होता आणि त्याला NSE चे इतके डिटेल माहीत नव्हते. अशा स्थितीत कथित बाबा मंत्रालयाशी संबंधीत माणूस असण्याची शक्यता अधिक आहे.

आनंद सुब्रमण्यम बाबा असण्याची शक्यता कमी
सूत्रांनुसार NSE चे माजी ग्रुप ऑपरेटिंग अधिकारी आनंद सुब्रमण्यम हे योगी बाबा असण्याची शक्यता खूप कमी आहे. कारण चित्रा आणि बाबा यांच्यात ज्या मेलवर बोलणे होत होते, ते पाहून असे वाटते की, हा बाबा एक प्रभावशाली व्यक्ती आहे. मेलमध्ये चित्रा आणि बाबा यांचे सुब्रमण्यमविषयी बोलणे झाले आहे.

आनंद सुब्रमण्यम यांना 1 एप्रिल 2013 ला NSE चे चीफ स्ट्रॅटजिक ऑफिसर बनवले होते.
आनंद सुब्रमण्यम यांना 1 एप्रिल 2013 ला NSE चे चीफ स्ट्रॅटजिक ऑफिसर बनवले होते.

रामकृष्ण यांची 20 वर्षांपूर्वी झाली होती योगीसोबत भेट
हिमालयाचा योगी कोण आहे, हे अद्याप पूर्णपणे समजलेले नाही. फक्त बाबांचा ईमेल आयडी rigyajursama@outlook.com सापडला आहे. योगी परमहंस असल्याचे चित्रा रामकृष्ण यांनी सेबीला चौकशीदरम्यान सांगितले. हिमालयाच्या रांगेत कुठेतरी राहतात.

वीस वर्षांपूर्वी गंगेच्या तीरावर एका यात्रेदरम्यान ही भेट झाली होती. चित्रा त्या निराकार बाबाला ईमेलद्वारे विचारायच्या की कोणत्या कर्मचाऱ्याला किती रेटिंग द्यायचे आणि कोणाला प्रमोशन करायचे आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची सर्व महत्त्वाची माहिती बाबांसोबत शेअर केली जात होती. बोर्ड मीटिंगचा अजेंडाही बाबांना दिला जात होता. चित्रा यांच्या म्हणण्यानुसार, योगी आपल्या इच्छेनुसार कुठेही प्रकट होऊ शकत होते.

अदृश्य योगीच्या सल्ल्याने घेतले जात होते निर्णय
चित्रा रामकृष्ण हिमालयातील एका अदृश्य योगीच्या सल्ल्याने निर्णय घेत असत. या बाबाच्या सांगण्यावरून त्यांनी आनंद सुब्रमण्यम यांची एक्सचेंजमध्ये ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आणि व्यवस्थापकीय संचालकांचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली. चित्रा रामकृष्णा एप्रिल 2013 ते डिसेंबर 2016 पर्यंत NSE च्या MD आणि CEO होत्या. या दरम्यान त्या एका अनामिक योगीवर प्रभावित होऊन निर्णय घेत होत्या.

चित्रा योगींना शिरोमणी म्हणत असत. जी त्यांच्या मते एक आध्यात्मिक शक्ती आहे आणि गेली 20 वर्षे त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक विषयांवर मार्गदर्शन करत आहे. चित्राच्या म्हणण्यानुसार, योगी आपल्या इच्छेनुसार कुठेही प्रकट होऊ शकत होते.

2015 मध्ये मिळाली होती तक्रार
2015 मध्ये, एका व्हिसलब्लोअर मार्केट रेग्युलेटर SEBI वरुन को-लोकेशन स्कॅमची तक्रार केली होती. यामध्ये म्हटले होते की, NSE मध्ये वरिष्ठ व्यवस्थापन लेव्हलवर मोठ्या प्रमाणात हेराफेरी सुरू आहे. को-लोकेशन स्कॅम म्हणजे, एक्सचेंजच्या बिल्टिंगमध्ये सर्व्हरच्या जवळ जागा देऊन काही लोकांना फायदा पोहोचवणे. त्याचवेळी चित्राचे नावही समोर आले होते. त्यावेळी सेबीने चित्राला कारणे दाखवा नोटीसही पाठवली होती. सेबीने तपास पूर्ण केल्यानंतर नुकताच हा अहवाल शेअर केला आहे.

अनेक लोकांची चौकशी याप्रकरणी चित्रा रामकृष्ण यांची चौकशी केल्यानंतर केंद्रीय तपास एजेन्सी (CBI)ने को-लोकेशन प्रकरणात NSE चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रवी नारायण यांची चौकशी केली आहे. CBIने NSE चे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर आनंद सुब्रमण्यम आणि माजी CEO रवी नारायण यांच्यासह चित्रा रामकृष्ण यांच्यावरही बंदी घातली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघांविरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. म्हणजेच हे तिघे आता देश सोडून जाऊ शकणार नाहीत.

बातम्या आणखी आहेत...