आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • How To Maintain Cibil Score; Good Cibil Score Is Important For Taking Loan | Cibil Score

कर्ज घ्यायचे तर सिबील स्कोअर चांगला हवा:सिबील वाढविण्यासाठी या 5 गोष्टी ठेवा लक्षात; ज्यामुळे कर्ज घेताना तुम्हाला होईल फायदा

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोविड लॉकडाऊनंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आली आहे. यासोबतच कर्जाची मागणीही वाढत आहे. कारण काही जण त्यांचा व्यवसाय आणि उपक्रम नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत, तर काही नवीन स्टार्टअप सुरू करत आहेत. याशिवाय प्रत्येकाला आपल्या छोट्या-मोठ्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्जाची गरज असते. त्याचवेळी, वित्त क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी, अनेक कंपन्यांनी उमेदवारासाठी चांगला CIBIL स्कोर असणे देखील आवश्यक केले आहे. अशा परिस्थितीत चांगला सिबील स्कोअर राखणे आवश्यक आहे.

आधी समजून घ्या की, हे सिबील काय आहे?
CIBIL (क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड) ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून परवाना मिळालेल्या क्रेडिट स्कोअर रिपोर्टिंग कंपन्यांपैकी एक आहे. याशिवाय Equifax, Experian आणि CFI Highmark देखील भारतातील क्रेडिटबद्दल माहिती देतात.

CIBIL स्कोअर ही 300 ते 900 मधील तीन अंकी संख्या आहे. जी व्यक्तीचा क्रेडिट इतिहास दर्शवते. यावरून त्या व्यक्तीचे बँक किंवा बिगर बँकिंग संस्थांशी कसे व्यवहार झाले आहेत हे दिसून येते. CIBIL स्कोर वाढविण्यासाठी किमान एकदा कर्ज घ्यावे लागेल. हे एका दिवसात बनत नाही, 18 ते 36 महिने यासाठी लागतात.

कर्जासाठी CIBIL स्कोअर महत्त्वाचा आहे
कर्ज प्रक्रियेत CIBIL स्कोअर महत्त्वाची भूमिका बजावते. जर ते चांगले असेल तर कर्ज मंजूर होण्यास कोणतीही अडचण नाही. जर ते कमी असेल तर कर्ज मिळणे कठीण होते. बहुतांश बँका किंवा वित्त कंपन्या कर्ज देण्यासही नकार देतात. चांगल्या CIBIL स्कोअरसह कमी व्याजावर कर्ज मिळण्याचीही शक्यता आहे. 300 ते 550 चा CIBIL स्कोअर कमकुवत मानला जातो. तर 550 ते 650 सरासरी, 650 ते 750 चांगला आणि 750 ते 900 सर्वोत्तम मानला जातो.

खर्च, कर्ज परतफेड आणि क्रेडिट कार्ड वापराशी संबंधित काही सवयी आहेत. ज्यांचा तुमच्या सिबील स्कोअरवर चांगला किंवा वाईट परिणाम होतो. तुम्ही तुमचा CIBIL स्कोअर कसा सुधारू शकता किंवा तो कमी असल्यास तो कसा वाढवता येईल, यासाठी खालील 5 मुद्दे महत्त्वाचे ठरणार आहेत.

1. थकबाकी वेळेवर भरा:

जर तुम्ही कर्ज घेतले असेल आणि वेळेवर EMI पेमेंट करत नसेल तर ते तुमच्या CIBIL स्कोअरसाठी चांगले नाही. ही सवय आजच बदला. कर्जाचा EMI वेळेवर भरा. हे CIBIL स्कोअर सुधारेल आणि राखेल.

2. क्रेडिट कार्ड जपून वापरा:

क्रेडिट कार्ड हे आता लोकांच्या गरजा पूर्ण करण्याचे प्रमुख साधन बनले आहे. तथापि, त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरल्यास CIBIL स्कोअरही कमी असतो. म्हणूनच त्याचे बिल वेळेवर भरा, जरी ते किमान पेमेंट असले तरीही.

3. जितके कर्ज तुम्ही सहज फेडू शकता तितके घ्या :

बँक किंवा वित्तीय कंपनीकडून जितके कर्ज तुम्ही सहज परत करू शकता तितकेच कर्ज घ्या. कारण तुम्ही जास्त कर्ज घेतल्यास EMI जास्त असेल आणि त्याच्या पेमेंटमध्ये उशीर झाल्याचा थेट परिणाम CIBIL स्कोअरवर होईल.

4. CIBIL स्कोअर पुन्हा पुन्हा तपासू नका

आज अनेक प्रकारचे मोबाइल अ‌ॅप्स आहेत. ज्याचा वापर करून सिबील स्कोअर तपासता येतो. असे करणे टाळले पाहिजे, कारण वारंवार स्कोअर तपासल्याने देखील CIBIL स्कोअर खाली येतो.

5. संयुक्त खात्यांबाबत सावधगिरी बाळगा

संयुक्त खात्याचे किंवा दुसऱ्याच्या कर्जाचे हमीदार बनणे नेहमीच टाळले पाहिजे. कारण भागीदाराने कर्ज घेतल्यावर कोणतीही चूक झाल्यास त्याचा थेट संयुक्त खातेदाराच्या CIBIL स्कोअरवर परिणाम होतो. त्यामुळे ज्यांच्यावर तुमचा चांगला विश्वास आहे त्यांच्यासाठीच अशी जबाबदारी घेणे चांगले.

CIBIL स्कोअर कसा तपासायचा?
CIBIL स्कोअर पॅन क्रमांकाच्या मदतीने तपासला जातो. CIBIL च्या अधिकृत वेबसाइट www.cibil.com वर सिबील स्कोअर विनामूल्य ऍक्सेस केला जाऊ शकतो. पण, ही सुविधा वर्षातून एकदाच मिळते. CIBIL वेबसाइटवरून CIBIL स्कोअर एकापेक्षा जास्त वेळा तपासण्यासाठी, एखाद्याला सशुल्क सदस्यता योजना घ्यावी लागेल. यासाठी 550 रुपयांचा मासिक सबस्क्रिप्शन प्लॅन घ्यावा लागेल. CIBIL वेबसाइट व्यतिरिक्त, CIBIL स्कोअर मोबाईल अ‌ॅप, बॅंकिंग सर्व्हिस एग्रीगेटर्स किंवा नॉन-बँकिंग संस्थेच्या वेबसाइटवरून देखील तपासता येतो.

सिबील स्कोअर संदर्भातील अन्य बातम्या वाचा

क्रेडिट स्कोअर जो सर्वांना सिबील (CIBIL) स्कोर नावाने जास्त परिचीत आहे. कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळविण्यासाठी हा सिबील स्कोर अतिशय महत्त्वपूर्ण आहे. 700 च्या वर सिबील स्कोअर सामान्यतः चांगला मानला जातो. तुमचा स्कोअर जितका जास्त असेल तितका तुमचाय कर्जाचा अर्ज मंजूर होण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही कर्जासाठी अर्ज करता तेव्हा बहुतांश बँका आणि तुमचा क्रेडिट स्कोअर अहवाल NBBC कडून मिळवतात.​​​​​​ सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बातम्या आणखी आहेत...