आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Circular Issued By CBDT On UPI, Refund Of Transaction Fees In Rupees From January, Instructions To Banks

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवी दिल्ली:जानेवारीपासून यूपीआय, रुपेद्वारे व्यवहारांवरील शुल्क परत द्या, बँकांना निर्देश, सीबीडीटीने जारी केले परिपत्रक

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बँकांना १ जानेवारी २०२० किंवा त्यानंतर इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे केलेल्या व्यवहारांवर वसूल केलेले शुल्क परत करावे लागेल. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) रविवारी याबाबतचे निर्देश दिले.

परिपत्रकात म्हटले आहे की, प्राप्तिकर कायदा, १९६१ च्या कलम २६९ एसयूनुसार निर्धारित इलेक्ट्रॉनिक मोडचा वापर करून १ जानेवारी किंवा त्यानंतर केलेल्या ई-व्यवहारांवर बँकांनी शुल्क घेतले असेल तर ते त्वरित परत करावे. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि कॅशलेस इकॉनॉमीच्या दिशेने आगेकूच करणे हा त्यामागील मुख्य हेतू आहे.

झाले होते विक्रमी १४९ कोटी व्यवहार
एका आकडेवारीनुसार डिजिटल पेमेंटने या वर्षी जुलै महिन्यात नवा विक्रम नोंदवताना १४९ कोटी व्यवहार झाले होते. त्यांचे एकूण मूल्य २.९१ लाख कोटी रुपये आहे. त्याआधी जूनमध्ये १३४ कोटी व्यवहार झाले होते. त्यांचे एकूण मूल्य २.६१ लाख कोटी रुपये होते.