आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुचाकी:रिटेल मागणी वाढल्याने ग्राहकांच्या धारणेत स्पष्ट बदल : पवन मुंजाल

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हीरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष म्हणाले, मेमध्ये १.६ लाख दुचाकी विकल्या

दर आठवड्याला रिटेल मागणी आणि विक्रीत वाढ असल्याचे आम्ही पाहताेय. ग्राहक सेंटिमेंटमध्ये आता स्पष्ट सुधारणा दिसू लागली आहे. आम्ही मे महिन्यात १.६ लाख दुचाकी विकल्या. पुढे मागणीत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. हीरो मोटोकॉर्पचे सीईओ आणि चेअरमन पवन मुंजाल यांनी एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली.

मुंजाल यांनी सांगितले की, आम्ही आमचे जवळपास सर्व उत्पादन प्रकल्प पुन्हा सुरू केले आहेत. जवळपास ९० टक्के कस्टमर टच पॉइंट सुरू केले आहेत. या कठीण काळात आपल्या सर्व हितचिंतकांशी स्पष्ट आणि सतत, प्रभावी पद्धतीने संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. हे बघून आम्ही कर्मचारी, डिलर, सप्लाय चेन पार्टनर आणि वैश्विक वितरकांसह आमच्या विविध स्टेकहोल्डर ग्रुपसोबत जवळपास ३० डिजिटल टाऊन हॉल केल्या आहेत. ग्राहकांच्या बदलणाऱ्या प्राथमिकतेच्या ट्रेंडवर मुंजाल यांनी सांगितले की, लोक परवडणाऱ्या वैयक्तिक गाड्यांना प्राथमिकता देतील. कारण विषाणू बघता लोक सार्वजनिक आणि शेअरिंग वाहतुकीपासून लांब राहतील. अल्पावधीत दुचाकी, परवडणारी वाहने, एफएमसीजी आणि आरोग्यसेवा यासारख्या विशिष्ट क्षेत्रात वेगाने वाढ होईल. ग्रामीण बाजार सर्वात चांगले प्रदर्शन करतील अशी आशा मुंजाल यांना आहे. त्यांनी सांगितले की, आमची अर्धी विक्री ग्रामीण भागात होते. कृषी क्षेत्रात गतिविधी वाढल्या, सरकारचे मदत पॅकेज व चांगल्या मान्सूनच्या अंदाजामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था शहरीपेक्षा चांगले प्रदर्शन करेल. मेमध्ये विक्री वाढल्याबद्दल मुंजाल यांनी सांगितले की, आम्ही एक टास्क फोर्स बनवला होता. ४ मेपासून काम सुरूदेखील केले.

बातम्या आणखी आहेत...