आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार:सेन्सेक्स 303 अंकांच्या घसरणीसह 53,749 वर बंद, निफ्टी 99 अंकांनी घसरला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अस्थिर व्यापारादरम्यान, प्रमुख निर्देशांकात सुरुवातीला वाढ नोंदवण्यात आली असली तरी दिवसभराच्या व्यवहारानंतर यामध्ये घसरण झाली. निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी 16,100 च्या खाली बंद झाला. सेन्सेक्स 303.35 अंक किंवा 0.56% घसरून 53,749.26 वर बंद झाला. तर निफ्टी 99.40 अंक किंवा 0.62% घसरून 16,025.80 वर होता.

निफ्टीमध्ये समावेश असलेले एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स, डिव्हिस लॅब्स, यूपीएल आणि टीसीएस हे शेअर सर्वाधिक वाढले, तर एनटीपीसी, एचडीएफसी लाइफ, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी आणि भारती एअरटेल या शेअरमध्येही वाढ नोंदवण्यात आली.

बँका वगळता, तेल आणि वायू, धातू, फार्मा, रियल्टी, भांडवली वस्तू यासारख्या सर्व क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली. तर आयटी निर्देशांक 1-3% ने घसरला. बीएसई मिडकॅप निर्देशांक 1.9% आणि स्मॉलकॅप निर्देशांक 2.9% घसरला.

बातम्या आणखी आहेत...