आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Closed Schools Hit Stationery Traders; During April June, Business Declined By 80%

कोरोना:बंद शाळांमुळे स्टेशनरी व्यापाऱ्यांना फटका; एप्रिल-जूनदरम्यान 80% व्यवसाय घटला

औरंगाबाद /नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या तीन महिन्यांत होत होता 2000 कोटींचा व्यवसाय, या वेळी 400 कोटीपर्यंत पोहोचेल

नितीन खुळे, शरद पांडेय

कोरोना महारोगराईमुळे शाळा बंद असल्याने स्टेशनरी व्यवसायावर वाईट परिणाम झाला आहे. अॉनलाइन शिक्षणामुळे देशभरातील स्टेशनरी व्यापाऱ्यांचा सुमारे १,६०० कोटी रुपयांचा माल गोदामांत पडून आहे. एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने स्टेशनरी व्यापाऱ्यांचा सीझन असतो. ते या दरम्यान दरवर्षी ४,००० कोटी रुपयांचा व्यवसाय करत होते. त्याची वार्षिक उलाढालीत ५०% हिस्सेदारी होती. मात्र, कोरोनामुळे या वर्षी या तीन महिन्यांत ४०० कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय पोहोचण्याचा अंदाज आहे. उर्वरित माल गोदामांत आहे. दिल्ली स्टेशनरी असोसिएशनचे सरचिटणीस श्याम रस्तोगी म्हणाले, स्टेशनरीत दिल्ली देशाचा सप्लाय हब आहे. येथून देशात माल पुरवठा होतो. महाराष्ट्र, प. बंगाल, तामिळनाडूसह अनेक राज्यांत कोरोना फैलावल्याने या राज्यांतून व्यापारी येत नाहीत.

औरंगाबादमध्ये १०-२० कोटींचा व्यवसाय ठप्प
महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये शाळा बंद असल्यामुळे स्कूलबॅग, वॉटरबॅग, युनिफॉर्म, सॉक्स, श्ूज, बेल्ट आदींचा पूर्ण व्यवसाय ठप्प आहे. येथे मार्च ते जुलैदरम्यान साधारण १०-१२ कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. स्कूल बॅग विक्रेते बिग स्टोअरचे विनायक सोनार म्हणाले, आमचा सीझन ७० लाख रुपयांचा असतो. या वेळी निम्मा व्यवसायही होऊ शकला नाही. पुण्यातील डेक्कन भागात ए वन बॅग सेंटरचे मालक रमेश कोळी म्हणाले, शाळा सुरू होण्याच्या काळात ३-४ दिवसांत आम्ही सव्वा लाखाचा माल विकत होतो. मात्र, आता विक्री होत नाही. दुकानाचे भाडे ३० हजार रुपये महिना आहे.

सुमारे २ लाख लहान-मोठे व्यापारी स्टेशनरी व्यवसायात
देशात सुमारे २ लाख लहान-मोठे व्यापारी स्टेशनरी व्यवसायात आहेत. एकट्या दिल्लीत सुमारे १५-२० हजार व्यापारी आहेत. दिल्लीत व्यवसाय मंदावल्याचा अंदाज यावरून लक्षात येऊ शकेल की, व्यापारी आठवड्यातून दोन ते तीन दिवसच दुकान उघडत आहेत. विद्या बाल भवन, दिल्लीचे चेअरमन डॉ. सतवीर शर्मा म्हणाले, ऑनलाइन क्लासेसमुळे वह्या-पुस्तकांशिवाय अन्य स्टेशनरी वस्तू कमी खरेदी करत आहेत.

युनिफॉर्म तयार करणाऱ्या व्यावसायिकांना कर्जास नकार
मार्च ते ऑगस्टपर्यंत आमची १.५ कोटी रुपये उलाढाल होते. आम्हाला शाळा सुरू होण्याआधी १०-२० लाख रुपयांची आवश्यकता आहे. मात्र, बँका रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वाचा, मोरेटोरियम, वाढत्या वयाचे कारण देत कर्ज देत नाहीत. - माणिकचंद पोखर्णा, शांतिदूत युनिफॉर्म अँड अॅपरल, औरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...