आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामायक्रोसॉफ्टचे चेअरमन आणि सीईओ सत्य नडेला यांनी क्लाउड टेक्नोलॉजीला मोठा बदल घडवणारे (गेमचेंजर) तंत्रज्ञान म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे, की ते झपाट्याने लोकप्रिय होत आहे. नडेला सध्या भारतात आहेत. मंगळवारी मुंबईत मायक्रोसॉफ्ट फ्युचर रेडी लीडरशिप समिटमध्ये नडेला यांनी क्लाउड आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय)ला आवश्यक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, हे दोन्ही तंत्रज्ञान आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरतील. क्लाउड सध्या सुरुवातीच्या काळात आहे. यामुळे मोठा बदल होणार ओह. भारतात टॉप क्लाउड कम्प्युटिंग प्रोव्हायडर्समध्ये अमेझॉन वेब सर्व्हिस (एडब्ल्यूएस), गुगल क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट एशरचा समावेश आहे.
भारतात वार्षिक २३ टक्के वाढतेय क्लाऊड मार्केट रिसर्च फर्म आयडीसीच्या मते, भारतात क्लाउड सर्व्हिस मार्केट दरवर्षी २३.१% ने वाढत आहे. २०२२च्या पहिल्या सहामाहीत त्याची कमाई सुमारे २३,२४० कोटी रुपये होती. २०२६ पर्यंत १.०८ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.