आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Commodities Started To Become Cheaper, Prices Of Daily Use Products Fell By 20 Percent

भाव वाढल्याने मंदावली होती विक्री:स्वस्त होऊ लागल्या वस्तू, रोजच्या वापरातील उत्पादनांच्या किमती 20 टक्क्यांनी घटल्या

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी माल आणि खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना मिळू लागला आहे. साबण, पेस्ट आणि बिस्कीटसारख्या रोज वापरात येणाऱ्या वस्तू (एफएमसी) बनवणाऱ्या कंपन्यांनी सप्टेंबरपासून किमती कमी केल्या आहेत. फॉर्च्यून इंडियाच्या मते, प्रमुख एफएमसीजी कंपन्यांनी प्रॉडक्ट्सचे भाव २-२०% पर्यंत कमी केले आहेत. यापूर्वी या कंपन्यांनी सुमारे एका वर्षापर्यंत किमतीत ८-१५% वाढ केली होती. खरं तर तेज महागाईमुळे वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे एफएमसीजी कंपन्यांच्या विक्रीवर परिणाम झाला होता. फॉर्च्यून इंडियाच्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीपासून ते आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या तिमाहीदरम्यान एफएमसीजी कंपन्यांच्या विक्रीत मोठी घसरण आली होती.

एफएमसीजी कंपन्यांनी ग्राहकांवर लक्ष केंद्रित केले. बीएनपी परिबाच्या म्हणण्यानुसार, सर्वात मोठे कारण म्हणजे चढ्या किमतीमुळे गेल्या सहा महिन्यांपासून लोकांनी स्वस्त नॉन-ब्रँडेड उत्पादने खरेदी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कंपन्यांना किंमती कमी केल्या.

भाव वाढल्याने मंदावली होती एफएमसीजी कंपन्यांची विक्री कंपनी क्यू1-2022 क्यू1-2023 एचयूएल 9% 6% आयटीसी 30% 26% नेस्ले 25% 6.4% मॅरिकाे 21% -6% (एचयूएल: हिंदुस्तान युनिलिव्हर, स्रोत: फॉर्च्यून इंडिया)

आता कंपन्या कमी करतील किमती
या महिन्यापासून एचयूएल आणि गोदरेज कन्झ्युमरच्या व्यतिरिक्त इतर एफएमसीजी कंपन्यादेखील भाव कमी करतील. आयटीसीचा यात समावेश आहे. कारण कमोडिटीच्या किमती कमी होऊ लागल्या आहेत. गुरुवारी आलेल्या बीएनपी परिबाच्या एका अहवालात सांगण्यात आले की, वाढत्या किमतींमुळे एफएमसीजीची विक्री मंदावली आहे. विशेष करून ग्रामीण भागात व्हॉल्यूम वाढ घटली. सामोरे जाण्यासाठी कंपन्या किमती कमी करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...