आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१ एप्रिलपासून होणारे नवे आर्थिक वर्ष बाजारासाठी शुभ ठरणार आहे. विश्लेषकांच्या मते रिटेल बाजारात मजबुती, एकानंतर एक आयपीएल, ग्रामीण मागणीच्या चांगल्या संकेतांनी विक्री तीन वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचली आहे. कंपन्यांनीही या संधीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करण्याची कोणतीच कसर सोडली नाही. पुढील तिमाहीत त्या प्रचार आणि प्रसारावर मोठा खर्च करण्याच्या तयारीत आहेत. कम्युनिकेशन एजन्सी मेडिसन वर्ल्डचे चेअरमन सॅम बलसारा म्हणाले, ‘पारंपारिक अर्थव्यवस्थेत जोरदार पुनरागमन होणार आहे, कारण या वर्षी अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंचे उद्योग पुनरुज्जीवित होण्याची अपेक्षा आहे. महामारीमुळे त्यावर मोठा परिणाम झाला होता. ग्रामीण भागातील मागणी पुनरुज्जीवित होण्याच्या चिन्हांव्यतिरिक्त, कंपन्या प्रवास आणि पर्यटनाच्या जाहिरातींवरही मोठा खर्च करत आहेत. गोदरेज समूह, कोका-कोला, डाबर, मारुती, बिसलेरी, लोटस हर्बल्स आणि हिताची यांच्या सीइओंनी सांगितले की, एप्रिल-जून तिमाहीत त्यांना चांगली विक्री होण्याची आशा आहे. त्यामुळे जाहिराती आणि मार्केटिंगवर मोठा खर्च करणार आहेत. यंदा उन्हाळाही लवकर लागला. बाजारात उत्पादनांना मोठी मागणी आहे. नवी उत्पादनेही यात मोठी भूमिका बजावत आहेत. काही सीईओंच्या मते या संधीचे सोने करण्यासाठी जाहिरात खर्च वाढवणे, ग्राहकांसाठी जाहिराती तर्कसंगत करून पॉवर ब्रँड तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विश्लेषकांच्या मते एकतृतीयांश विक्रीसाठी ग्रामीण मागणीवर अवलंबित एफएमसीजी कंपन्यांनाही जाहिरातीवर अधिक खर्च केल्यास विक्री वाढण्याची अपेक्षा आहे. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीचे प्रतिनिधी (मार्केटिंग अँड सेल्स) शशांक श्रीवास्तव म्हणाले,“आर्थिक वर्ष २०२३-२४ हे आमच्यासाठी सर्वाधिक विक्रीचे वर्ष असेल. अनेक नवीन लाँच आणि अन्य मोहिमांसह विपणन खर्च अंदाजे रु. १,५०० कोटी आहे.पुढील वर्षी जाहिरात खर्चातही १५-२०% वाढ करू.’ गोदरेज अप्लायंसेसचे एक्झिक्युटिव्ह व्हॉइस प्रेसिडेंट कमल नंदी म्हणाले, “वाढत्या तापमानामुळे वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही उन्हाळ्यात विशेषत: कूलिंग श्रेणींवर ब्रँडचा खर्च वाढवू.कोका-कोला इंडिया आणि साउथ वेस्ट एशियाचे व्हाॅइस प्रेसिडेंट (मार्केटिंग) अर्नब रॉय म्हणाले, व्यवसायात जोरदार गती दिसून येत आहे. त्यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत आम्ही जाहिरातींवर अधिक खर्च करू. बिसलेरी, लोटस हर्बल्सनेही असेच ठरवले आहे. मीडिया इन्व्हेस्टमेंट कंपनी ग्रुप एमचेे साउथ वेस्ट आशियाचे सीईओ प्रशांत कुमार म्हणाले, “गेल्या तीन वर्षांतील आर्थिक चढ-उतार आणि जागतिक घडामोडींचा विक्रीवर परिणाम झाला आहे. भारतीय इकॉनॉमी या आव्हानांचा कसून सामना करेल आणि आर्थिक वाढ नोंदवेल.’ ग्रुप एमच्या फेब्रुवारीतील अहवालात २०२३ मध्ये देशात विक्री वाढवण्यासाठी जाहिरात खर्चावर १५.५% वाढीचा अंदाज वर्तवला गेला. यात म्हटले की, २०२२ च्या तुलनेत या वर्षी जाहिरात खर्चात २० हजार कोटी रुपयांची वाढ होईल. याचे श्रेय ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनाला जाते.
या वर्षी उन्हाळा लवकर लागल्यानेही अर्थव्यवस्थेला मिळाली गती
विश्लेषकांच्या मते, या वर्षी उन्हाळा लवकर सुरू झाला. याची अर्थव्यवस्थेला गती देण्यात मोठी भूमिका राहिली. बाजाराची ही मागणी पूर्ण करण्यासाठी ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांनीही तयारी केली आहे. पॅनासोनिक मार्केटिंग आणि पॅनासोनिक लाईफ सोल्युशन्सचे एमडी फुमियासू फुजिमोरी म्हणतात, “आम्हाला यावर्षी एसी, फ्रीजसारख्या उन्हाळी उत्पादनांच्या विक्रीत चांगली वाढ अपेक्षित आहे. या वर्षीही वाढीचा वेग दुहेरी अंकात कायम राहण्याची अपेक्षा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.