आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Companies Will Give Double Increment, Life Sciences And IT Sector Will Have The Highest Salary Hike Since Last Year

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खुशखबर:कंपन्या देणार मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट वेतनवाढ, लाइफ सायन्स आणि आयटी क्षेत्रात सर्वाधिक सॅलरी हाइक

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2021 मध्ये सरासरी वेतनवाढ 7.3% असू शकते, ही मागील वर्षी 4.4% होती

देशातील नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा कंपन्या कर्मचाऱ्यांना मागच्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट वेतनवाढ देण्याच्या तयारीत आहेत. डेलॉइट इंडीयाच्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, यावर्षी 7.3% सरासरी वेतनवाढ होऊ शकते. 2020 मध्ये 4.4% वेतनवाढ देण्यात आली होती. परंतु, 2019 मध्ये ही टक्केवारी 8.6% होती. यावर्षी 92% कंपन्यांकडून वेतनवाढ देण्यात येणार असून यात 2020 मध्ये 60% कंपन्यांनी वेतनवाढ केली होती.

20% कंपनी देणार दोन अंकी वेतनवाढ

डेलॉयट इंडियाच्या रिपोर्टनुसार, यावर्षी जास्तीत-जास्त कर्मचाऱ्यांना दोन अंकी वेतनवाढ मिळू शकते. गेल्या वर्षी 12% कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दोन अंकी वेतनवाढ केली होती. परंतु, यावर्षी 20% कंपन्या असे धोरण राबवण्याच्या तयारीत आहेत. यामुळे, अपेक्षेपेक्षा अधिक चांगली आर्थिक रिकव्हरी, व्यवसायाच्या आत्मविश्वासात पुनरुज्जीवन, कंपन्यांच्या नफ्यात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या वर्षी 60% कंपन्यांनी दिले होते वेतनवाढ

डेलॉइट इंडियाचे पार्टनर आंनदरूप घोष म्हणतात की, व्यापाराने वेग पकडला असून कंपनी वेतनवाढीवर अफोर्डेबिलिटी आणि फिक्स्ड कॉस्टच्या वाढीनुसार खर्च करत आहे. 2020 मध्ये 60% कंपन्यांनी वेतनवाढ दिली होती आणि त्यातील एक तृतीयांश म्हणजे 20% ने वर्षाच्या मध्यात वाढ केली होती. ज्या कंपनीने गेल्या वर्षी वेतनवाढ दिली नव्हती त्यातील 30% कंपन्या यावर्षी जास्तीत-जास्त वेतनवाढ करत मागील नुकसान भरपाई देणार आहेत.

कंपनी वेतनवाढीबाबत सांभाळून पाऊल टाकत आहे

घोष यांनी पुढे सांगितले की, मार्च 2020 नंतर जास्तीत-जास्त कंपन्यांनी वेतनवाढ थांबवण्याचा किंवा परिस्थिती सामान्य होईपर्यंत वेतनवाढ टाळण्याचा निर्णय घेतला. तसेच, 25% कंपन्यांनी आपल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात केली होती. कंपन्यांचे धोरण काही कर्मचाऱ्यांना जास्त वेतनवाढ न करता कर्मचाऱ्यांची नोकरी वाचवण्यावर आहे.

लाईफ सांयस आणि IT क्षेत्रात सर्वात जास्त वेतनवाढ

रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, यावर्षी प्रत्येक क्षेत्रात वेतनवाढ दिली जाऊ शकते. सर्वात जास्त वेतनवाढ ही लाईफ सांयस आणि आयटी क्षेत्रात दिली जाईल. उत्पादन व सेवा क्षेत्रातील पगारवाढ ही सामान्य असू शकते. लाईफ सांयसमध्ये 2019 ऐवढीच तसेच डिजिटल आणि ईकॉमर्स क्षेत्रात दोन अंकी वेतनवाढ दिली जाऊ शकते. सर्वात कमी वेतनवाढ ही हॉस्पिटॅलिटी, रियल इस्टेट, इंफ्रास्ट्रक्चर आणि रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात होईल.

10% कर्मचाऱ्यांना मिळणार प्रमोशन

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात 1.7% पट वाढ होऊ शकते. दुसरीकडे, कमी अपेक्षाच्या यादीत गेल्या वर्षीपेक्षा कमी कर्मचारी ठेवले जातील. यावर्षी 10% कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. तसेच, गेल्यावर्षी 7.4% ने पदोन्नती मिळाली होती. पदोन्नती मिळलेल्या कर्मचाऱ्यांची पगारवाढ 2020 मधील 5.4% वरून वाढून 6.9% होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...