आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Anil Ambani Company Bought By Mukesh Ambani, Approval Of NCLT, Reliance Jio To Acquire RITL, Latest News,

अनिल अंबानींची कंपनी मुकेश अंबानी खरेदी करणार:NCLTची मंजूरी; तोट्यात असलेली RITLला रिलायन्स जिओ घेणार

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या संकटाच्या काळात त्यांचे भाऊ मुकेश अंबानी यांनी धाव घेतली आहे. कारण उद्योगपती अनिल अंबानी सद्यस्थितीत कर्जबाजारी झालेले आहेत. त्यांची रिलायन्स इन्फ्राटेल (RITL) कंपनी विक्री करण्याच्या मार्गावर येवून पोहोचली आहे. या कंपनीला त्यांचे मोठे बंधू उद्योगपती मुकेश अंबानी हे खरेदी करणार आहे.

रिलायन्स जिओ ही कंपनी रिलायन्स इंन्फ्राटेलला खरेदी करणार आहे. यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT) सोमवारी रिलायन्स जिओला रिलायन्स इन्फ्राटेलच्या अधिग्रहणासाठी मंजूरी दिली आहे. NCLT ने रिलायन्स जिओला RCom चे टॉवर आणि फायबर मालमत्तांचे संपादन करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेत (एसबीआय) एस्क्रो खात्यात 3,720 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले आहेत.

नोव्हेंबरच्या सुरूवातीलाचा केली होती मागणी

नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीलाच रिलायन्स जिओ कंपनीने अनिल अंबानी यांची रिलायन्स इन्फ्राटेल विकत घेण्यासाठी नॅशनल कंपली लॉ ट्रिब्युनलशी संपर्क साधला होता. 6 नोव्हेंबरला जिओने RITL खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एस्क्रो खात्यात 3,720 कोटी रुपये जमा करण्याची ऑफर दिली होती.

RITL कंपनी सद्या दिवाळखोरीत

अनिल अंबानीं यांची RITL कंपनी सद्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2019 मध्ये जिओने ही कंपनी विकत घेण्यासाठी 3,720 कोटी रुपयांची बोली लावली होती. मात्र, कर्जदारांच्या समितीने 4 मार्च 2020 रोजीच जिओच्या रिझोल्यूशन प्लॅनला मंजूरी दिली होती.

कंपनीच्या निधीवरून बॅंकामध्ये वाद

RITL कडे 1.78 लाख मार्ग किमीची फायबर मालमत्ता आणि 43,540 मोबाईल टॉवर आहेत. ही आरकॉमच्या टॉवर आणि फायबर मालमत्तेची होल्डिंग कंपनी आहे. कंपनीच्या निधीबाबतही बँकांमध्ये वाद सुरू आहे. यामध्ये एसीबी, दोहा बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक आणि एमिरेट्स बँक यांचा समावेश आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. रिझोल्यूशन प्रोफेशनलने कर्जदारांच्या टप्प्यावर RITL च्या अप्रत्यक्ष कर्जदारांचे दावे वर्गीकृत केले होते. ज्याला दोहा बॅंकेने आव्हान दिले होते.

इतके मोबाईल टॉवर

कमिटी ऑफ क्रेडिटर्सच्या वतीने (COC) 4 मार्च 2020 रोजी पूर्ण मताने जिओच्या संकल्प योजनेला मंजुरी दिली. RITL कडे देशभरात सुमारे 1.78 लाख किलोमीटर मार्गाची फायबर मालमत्ता आणि 43,540 मोबाइल टॉवर आहेत. दरम्यान, 45 हजार कोटींहून अधिकची थकबाकी भरण्यात अयशस्वी झाल्याबद्दल IBC अंतर्गत अनिल अंबानी यांनी 2029 मध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यापैकी RITL वर 41,500 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

बातम्या आणखी आहेत...